
उस्माननगर, माणिक भिसे। दिवसेंदिवस गगणाला भिडणाऱ्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे बेहाल होत असून मकर संक्रांतीचा तिळगुळ व (वाण ) साहित्य खरेदी करताना नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात कात्री लागल्याने आर्थिक नियोजन आणि वाढत्या महागाईमुळे सर्व जनता परेशान आहे.


मकरसंक्रांतीचा सण म्हणजे सुवासिनी स्त्रियासाठी सर्वात मोठा सण मानल्या जातो. या सणाच्या निमित्ताने स्त्रिया वेगवेगळ्या वस्तुंचे वाण ( साहित्य ) एकमेकीना देत असल्या तरी मकर संक्रांतीला तिळगूळाला विशेष महत्त्व असते.तिळगुळ एकमेकांना देऊन , यापुढे प्रेमाने राहण्याचा मनोदय व्यक्त केल्या जाते.यावर्षी तिळगुळ बनविण्यासाठी लागणारे तिळ आणि गुळ व वाणाच्याही किमतीत कमालीची वाढ झाल्याने वाढत्या महागाईमुळे तिळगुळाची चव बेचव झाल्याने सर्वसामान्य नागरिकांत नाराजीचा सूर दिसत आहे.


तिळगुळ व सुवासिनी महीलांना वाण ( साहित्य) चमचा , वाट्या , कगवा ,शांम्पू ,पिना , आरसा ,घासणी ,इ.वाण म्हणून खरेदीसाठी बाजारात महीलाची गर्दी दिसत आहे. या सणाच्या निमित्ताने (स्त्रिया) महीला , मैत्रीणी एकत्र अनेक ठिकाणी येऊन हळदी कुंकूवाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकमेकिना तिळगुळ व वाण म्हणून भेट वस्तू दिल्या जातात.


दिवसेदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असतो.भारतीय परंपरेत प्रत्येक सण साजरा करण्याची प्रथा आहे.परंतु वाढत्या महागाईमुळे बदलत्या काळानुसार सणांची औपचारिकता तेवढी शिल्लक राहते की काय ? अशी शंका अनेकांनी व्यक्त केली.
