
नांदेड| सायन्स कॉलेज नांदेडच्या 1972 व 1973 च्या बॅचला या वर्षी 50 वर्षे पूर्ण झाली. हे औचित्य साधून या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन दि. 8 जानेवारी 2023 रोजी नांदेड येथे घेण्यात आले. या संमेलनास आज सत्तरीपुढे गेलेल्या माजी वर्गमित्रांनी मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


सुरवातीस सर्व सहभागी व त्यांचे कुटुंबीय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर सरस्वती पूजन करून दिवंगत गुरुवर्य प्राध्यापक व मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काळाच्या पडद्याआड गेलेले प्रिय मित्र व प्राध्यापक यांच्या आठवणीने काही काळ वातावरण भावुक झाले.


1972 व 73 या बॅच मधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी भावी जीवनात विविध क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत मोठे योगदान दिलेले आहे. हे लक्षात घेऊन व्यापार, उद्योग, साहित्य व वाङ्मय, प्रशासन संशोधन, पोलीस, कृषी, वैद्यकशास्त्र, समाजसेवा, इ. विविध क्षेत्रातील आपल्या वर्गमित्रांच्या योगदानाच्या परिचयाचे औचित्य संयोजकांनी साधले. त्यामुळेच सहमित्रांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव व सत्कार हा या स्नेहमिलनाचा मुख्य भाग होता.


यापैकी प्राचार्य डॉ.अरविंद कुलकर्णी आणि डॉ.सय्यद मशायक हुसेन काद्री यांच्या मार्ग दर्शना खाली प्रत्येकी आठ विद्यार्थी झ.हऊ. झाले.लक्ष्मीकांत देशमुख हे (ख.अ.ड.) कलेक्टर होते ते विज्ञान शाखेचे विद्यार्थी आसून ही साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे पुढे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाचे अध्यक्षपदी ते विराजमान झाले. इकबाल खान हे मुंबईत कस्टम कलेक्टर होते, त्यांनी स्मगलराच्या गोदमावर धाडी टाकून 480 कोटी रुपये चे सोने जप्त केले त्या बद्दल राष्ट्रपती चे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ.अविनाश देशमुख यांनी संशोधन करून अनेक प्रकारचे यंत्रे निर्माण केली त्या बद्दल त्यांना सात वेळा राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. किशोर केसराळे सोनेरी गावचे बिनविरोध सलग पंचवीस वर्षे सरपंच होते. त्यांच्या काळात तंटा मुक्तीगाव, स्वच्छग्राम हे रोख पुरस्कार ग्रामपंचायतीस प्राप्त झाले. गोविंद श्रीनिवार यांनी कार्यक्रम संचलनाचे काम अतिशय प्रभावीपणे केले.

परिश्रमपूर्वक संकलित केलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी खुमासदार व लालित्यपूर्ण शैलीत सर्व सत्कारमूर्तीच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेत गौरव केला व आपल्याच काही मित्रांच्या हस्ते त्यांचा सत्कार घडवून आणला. आपल्या मित्रांचे हे तेजस्वी कार्य व त्याचा सत्कार पाहतांना सर्वांची मने आनंद अभिमानाने भरून आली. उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाटासह पार पडलेल्या या कार्यक्रमात इतर वर्गमित्रांनी आपापल्या कलागुणांनी आकर्षक रंग भरले. गीतगायन, नकला, विनोदी चुटकुले, शेरोशायारी, आठवणी इ. मुळे या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.

प्राचार्य शिवाजी पाटील यांनी बासरी वादणानी आणि उषा चिटगोपेकर, रचीता हुरने, जगन्नाथ तालकोकुलवार प्रा. राजीव देशपांडे, गोविंद श्रींनीवार, बाबुराव बैनवाड यांनी आपल्या गायनाने श्रोत्यांची मने जिंकून घेतली. उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात दिवसभर पार पडलेल्या या स्नेहमीलनाने सर्वांच्या पूर्वस्मृतींना उजाळा दिला. तसे भावी जीवनासाठी जणू संजीवक प्रेरणा दिली. यामुळे हा योग सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला. हा स्नेहसंमेलन सोहळा यशस्वी होण्यासाठी संयोजक गोविंद श्रीनिवार, मोहन कुरुडे, रमेश सारडा, ओमप्रकाश हुरणे, विजयसिंह बिसेन व विलास दलाल यांनी विशेष परिश्रम घेतले.