
पुणे। रांजणगाव गणपती येथील कै.रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते प्रतिमेंचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कै. रामभाऊ गोपाळ फंड स्मृती वाचनालयाच्या वतीने नियमित वाचकांना सन्मानित करण्यात आले.


अध्यक्षस्थानी मानव विकास परीषद शिरूर तालुका अध्यक्ष विभावरी देव तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कविताताई माणिक खेडकर, शिरूर तालुका डॉट कॉम च्या उपसंपादक किरण पिंगळे, शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड, वैशालीताई बांगर (कार्याध्यक्ष मानव विकास परीषद), मंजुषा शिंदे (मंगलमूर्ती वुमन केअर फाउंडेशन) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


जीवन जगत असतात महापुरुषांचे विचार आपल्याला नेहमीच प्रेरणादायी असतात त्यामुळे शाळेच्या पुस्तकांच्या बरोबरीनेच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे. “ग्रंथ हेच गुरु ग्रंथ कल्पतरू”असे विचार मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.


हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी वाचनालयाच्या ग्रंथपाल नारायणी फंड व व्याख्याते निलेश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी सोहम फंड, अमोल ढोले, श्रावणी फंड, नितीन खेंगरे, व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथपाल नारायणी फंड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.
