नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगांव तालुक्यातील धडाडी नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते शंकर प्रकाशराव पाटील पवार यांची मराठा क्रांती दल महाराष्ट्र नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी तर पंडीतराव ढगे पाटील यांची नायगांव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
हि निवड मराठा क्रांती दल महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष अॅड राजीव भांगे पाटील , गजानन घाटफोडे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र व गजानन पंतगे पाटील यांच्या हस्ते दिनांक 10/01/2023 रोजी नायगांव येथिल ओमकार हाॅल मध्ये एका बैठकीत निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी नायगांव तालुक्यातील प्रकाश पाटील गोळेगावकर, ज्ञानेश्वर महागावे,शाहिर बळीराम जाधव, पत्रकार हणमंत चंदनकर, शिवाजी कुटुंरकर. यासह आदी नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.