Monday, May 29, 2023
Home नायगाव विज्ञान प्रदर्शन म्हणजे नवनिर्मितीचे प्रेरणा पीठ – शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे मॅडम -NNL

विज्ञान प्रदर्शन म्हणजे नवनिर्मितीचे प्रेरणा पीठ – शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे मॅडम -NNL

by nandednewslive
0 comment

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| शिक्षण विभाग पंचायत समिती नायगाव तथा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कृष्णूर यांच्या वतीने आयोजित 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जि.प.शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले.

या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री प्रशांत दिग्रसकर साहेब तसेच उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोड साहेब वित्त विभागाचे श्रीमान पाचंगे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नायगाव एम.जे.कदम सर विस्ताराधिकारी सुरेश पाटील सर केंद्रप्रमुख चिखलवार सर यांच्या समवेत अंतर्गत सर्व पदोन्नत मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रसंगी सौ बिरगे मॅडम यांचा योगायोगाने आलेल्या वाढदिवस यासाठी केक कापून सबंध विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.अनपेक्षित विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा व सुंदर नियोजन यामुळे त्या भारावून गेल्या.यांनी मनोगताच्या माध्यमातून शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी केलेले सुंदर नियोजन,भव्य व्यवस्था पाहून केंद्रप्रमुख श्री उद्धव ढगे यांचे कौतुक केले.शाळेच्या मुख्य प्रांगणात सुंदर वैज्ञानिक रांगोळी, आकर्षक वेशभूषेत मुलांचे लेझीम पथक,महाराष्ट्रीयन परंपरेला अनुसरून मुलींच्या हस्ते औक्षण,सर्व उपस्थितांवर विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पवृष्टी, दीपोत्सव आणि सर्व प्रयोग सादर करणाऱ्यांसाठी आकर्षक व्यवस्था व शालेय परिसरातील स्वच्छता पाहून त्यांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले.

येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून स्व सर्जनशीलतेला वाव द्यावा,यासाठी शिक्षकांनी त्यांना सदैव मार्गदर्शन रुपी प्रेरणा द्यावी अशी मौलिक सूचना केली. या प्रदर्शनात 51 शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता यामध्ये त्यांनी विज्ञान, गणित,पर्यावरण,तंत्रज्ञान,खेळणी व तसेच शिक्षकांचे वैयक्तिक प्रयोग मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आले.मुलांनी उत्साह पूर्वक तथा अभ्यासपूर्वक प्रयोगाचे विश्लेषण मान्यवरांना करून दिले. भविष्यामध्ये अधिकाधिक शाळेने यामध्ये सहभाग घ्यावा जे शिक्षक या उपक्रमामध्ये जाणीवपूर्वक सहभागी होत नाहीत अशा शिक्षकांची यापुढील काळामध्ये निश्चित नोंद घेतली जाईल.असा सूचक इशारा प्रसंगी स बिरगे मॅडम यांनी दिला.

तसेच या प्रदर्शनासाठी अगदी वेळातला वेळ काढून माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर साहेब यांच्या समवेत उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोड साहेब व श्रीमान पाचंगे साहेब यांनीही सर्व प्रयोगांना भेट दिली प्रसंगी त्यांनी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सूचनाही दिल्या.या दरम्यान त्यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कृष्णुर येथील नाविन्यपूर्ण ऍस्ट्रॉनॉमि क्लब व वाइल्ड लाईफ क्लबला भेट देऊन विशेष अभिनंदन केंद्रप्रमुख उद्धव ढगे व केंद्रीय मुख्याध्यापक हौसाजी वारघडे, व सहकार्यांचे केले अशा या नाविन्यपूर्ण क्लब ची माहिती विद्यार्थ्यांच्या द्वारे ऐकून त्यांनी समाधान व्यक्त केले.विशेषता या उपक्रमाची माहिती माननीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांपर्यंत नक्की पोहोचू.असे गौरव उद्गार प्रसंगी त्यांनी काढले. उपस्थित सर्व सहभागी सर्व विद्यार्थी यांच्या भोजनाची व्यवस्था केंद्रप्रमुख उद्धव ढगे यांनी केली त्यांना सहकार्य केंद्रीय मुख्याध्यापक श्री हौसाजी वारघडे,बालाजी आचेवाड,सौ पोतदार,मरेवार,विभुते,नागठाणे व श्रीमती मिरासे मॅडम यांनी केले.

या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक गटांमध्ये ब्लू बेल्स इंग्लिश मीडियम स्कूल नायगाव च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.त्याचबरोबर जनता हायस्कूल नायगाव आणि मिलेनियम पब्लिक स्कूल नायगाव यांनी व्दितीय तर जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर या शाळेने तृतीय क्रमांक या प्रदर्शनाच्या माध्यमातून पटकावला.तसेच शिक्षक प्रयोगातून माध्यमिक गटातून जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर यांच्या नवपक्रमास प्राधान्य देण्यात आले.प्राथमिक विभागातून केंद्रप्रमुख उद्धव ढगे यांच्या शैक्षणिक दिनदर्शिकेलाही जिल्हास्तरावर प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!