
हिमायतनगर, परमेश्वर काळे| नांदेड – किनवट एस. टी. महामंडळाच्या बस गाडया नियोजीत वेळेवर सोडून त्या गाड्यांची संख्या वाढवावी आणि शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशी आणि जेष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.


२ वर्षाच्या कोरोना काळात एस टी महामंडळाच्या बसच्या संख्येत घट झाली आहे, तर रेल्वे सुरु असल्याने एस टी महामंडळ किनवट आगाराने नांदेडकडे जाणाऱ्या बसगाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशी वर्गाना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नाईलाजास्तव प्रवाश्याना खाजगी वाहनाचा जीवघेणा प्रवास करत आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. त्यामुळे विशेषष्ट शालेय विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. शासनाने जेष्ठ नागरिकांसाठी मोफत बससेवा सुरु केली. मात्र किनवट हुन नांदेडकडे जाणाऱ्या बसेसची सांख्य कमी असल्याने जेष्ठ नागरिकांना आर्थिक भुर्दंड लावून खाजगी प्रवास करावा लागतो आहे.


हि बाबा लक्षात घेता अनेक नागरिकांनी आ.जवळगावखर यांच्याकडे किनवट-नांदेड बसच्या संख्या वाढूंन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे असे साकडे घातले होते. त्यामुळे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी वाढीव बसगाडया सोडणे बाबतचे पत्र एस टी महामंडळ आगाराला पाठविले आहे. त्यात म्हंटले आहे कि, आपल्या किनवट आगारामार्फत फक्त एक बसगाडी नांदेड येथे चालु आहे. हि गाडी नियोजीत वेळेत येत नसल्यामुळे प्रवाशांचे व विदयार्थाची गैरसोय होत आहे. तसेच आपल्या विभागामार्फत प्रवाशांच्या मागणी नुसार अगोदरच्या वेळेनुसार किनवट ते नांदेड हया बसगाडया हिमायतनगर येथे सकाळी नउ वाजता दुपारी एक वाजता सायंकाळी साडेचार वाजता व शेवटची साडेसात वाजता अशा पध्दतीने गाडयाचे वेळपत्रक ठेवण्यात आले होते.


तिचं पद्धत अवलंबून बसगाड्या वाढवाव्यात जेणे करून प्रवाशाची व विदयार्थाची होणारी गैरसोय होणार नाही. त्यासाठी पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे बसगाडया चालु करून सहकार्य करावे असेही देण्यात आलेल्या पात्रात म्हंटले आहे. यावरून तरी किनवट एस.टी महामंडळ आगाराकडून वाढीव बसेस चालू करून प्रवाशी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय सुटेल काय..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
