
हिमायतनगर,परमेश्वर काळे। मार्कण्डेय एजुकेशन संचालक काशिनाथ गड्डमवार म्हणाले की, मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र मेडीकल , इंजिनिअरिंग,प्यारामेडीकल , फार्मसी, ऍग्री या सारख्या प्रवेशासाठी ग्रामीण भागातील गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विध्यार्थी स्पर्धा परीक्षा सराव व अनुभव नसल्या अभावी हजारो विध्यार्थी स्पर्धा परीक्षाचे आवेदन फॉर्म भरत नाहीत. काहीजन फॉर्म भरून सुधा कॉलेज प्रवेश फॉर्म भरत नाहीत आणि दोन्ही फॉर्म भरले तरीही कागदपत्रे अपुरे पडत असल्यामुळे आज हजारो विध्यार्थी पुढील शिक्षणाचे उद्दीष्ट पूर्ण करू शकत नसल्याचे वाढत्या बेरोजगारी व नौकरी अभावी अनेक युवकांवर मजुरी करण्याची वेळ आल्याचा परिस्थिती वरून दिसते आहे.


ग्रामीण भागातील हीच परिस्थिती हेरून मार्कण्डेय एजुकेशनचे संचालक काशिनाथ गड्डमवार यांनी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. NEET, MHT-CET, JEE NDA व भविष्यात येणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षा या सारखे परीक्षाचे सराव करून आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी युवक युवतीने मार्कण्डेय एजुकेशन येथे एक प्रयत्नशील ३६५ दिवसाची मोफत कौशल्य विकास प्रशिक्षनात भाग घेऊन आपले भविष्य उज्वल घडवावे. यासाठी १०० % स्वता प्रॅक्टिकल नॉलेज व भविष्यात येणाऱ्या ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षेचा परिपूर्ण सराव करत सर्व प्रकारचे ऑनलाईन आवेदन फॉर्म भरण्या पासून ते विध्यार्थी कॉलेज प्रवेश पर्यत निशुल्क करून ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मदत करण्यासाठी या प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याचे मार्कण्डेय एजुकेशन संचालक काशिनाथ गड्डमवार यांनी सांगितले आहे.


वैद्यकीय प्रवेश प्रकीर्या मार्गदर्शन योग्य क्षेत्र ठरवण्यासाठी किंवा वैद्यकीय क्षेत्रात योग्य अभ्यासक्रम / प्रवाह निवडण्यासाठी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये बरेच गोंधळ, प्रश्न आणि समज असतात. अशा जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत पण स्पर्धा परीक्षा पासून दूर आहे. तसेच काही करण्याची इच्छा आहे ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी विध्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेचा परिपूर्ण सराव करणाऱ्या सर्वांना आमच्या मार्फत सर्व प्रकारचे ऑनलाईन आवेदन फॉर्म मोफत भरून दिले जाईल असेही मार्कण्डेय एजुकेशन संचालक काशिनाथ गड्डमवार यांनी म्हंटले आहे.

