
अर्धापूर। शाळा,रस्ते, शुद्ध पाणी,गरजू व अपंग विद्यार्थ्यांना मदत, सार्वजनिक विकासकामांना प्रोत्साहन पर बक्षीस,मयत सभासदांचा अपघाती विमा यासह बुलढाणा अर्बनची ९ राज्यात गरुडझेप, विक्रमी गुंतवणूक यामुळे देशात बुलढाणा अर्बनचे नाव मोठे झाले आहे असे प्रतिपादन मुख्याधीकारी शैलेष फडसे यांनी केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार मारोतराव जगताप,विभागीय व्यवस्थापक प्रफुल्लकुमार संचेती, नगरसेवक प्रवीण देशमुख,सोनाजी सरोदे, व्यंकटराव राऊत, सरपंच संघटनेचे निळकंठराव मदने,भगवानराव लंगडे,इंजी.नागनाथ देशमुख, डॉ शरद चरखा यांची उपस्थिती होती.


पाहुण्यांचा सत्कार शाल,हार देऊन संयोजक रामचंद्र बोंढारे पाटील यांनी केले.यावेळी मारोती जगताप म्हणाले कि, बुलढाणा अर्बनने सामाजिक उपक्रम राबवित १९ हजार करोड रुपयांची उलाढाल केली असून,साडेआठ हजार करोड प्रकरण कर्जवाटप केले आहे, ४७२ बॅकेच्या शाखा असून ४०५ गोदाम कार्यरत आहेत. अवघ्या ३६ वर्षात उत्तुंग भरारी घेत सामाजिक उपक्रमामुळे जनसामान्यांत नावलैंगिक प्राप्त केले आहे. छत्रपती कानोडे म्हणाले की,बुलढाणा अर्बनने मयत सभासदांना गरज असतांना भरीव मदत करण्याच्या उपक्रमाची प्रशंसा केली.


शैलैष फडसे म्हणाले कि, बॅंकेकडून ठेवीदारांना ठेव रक्कमे इतका व कर्जदारास कर्ज रक्कमे एवढा विमा या संस्थेमार्फत काढण्यात येतो. पण सभासदांना कोणताही आर्थिक भुर्दंड बसत नाही,रामचंद्र बोंढारे पाटील म्हणाले कि,संस्थापक राधेश्यामजी चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सुकेश झंवर यांच्या नियोजनबध्द प्रयत्नातून समाजीक उपक्रम राबवित बुलढाणा अर्बनने यशाचे शिखर गाठले आहे, कर्मचाऱ्यांनी नेहमी कामालाच परमेश्वर मानले आहे, त्यामुळे सांघीक यश प्राप्त होत आहे,असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन बी मदने यांनी तर आभार वसंत राऊत यांनी मानले.याप्रसंगी विजय काकडे, नामदेव दुधाटे, सखाराम क्षीरसागर,राजू देशमुख, अशोक डांगे,अजित गट्टाणी, राजकुमार मदने, प्रसाद हापगुंडे, इंजी.पांडुरंग देशमुख,सचीन काळे,शेख रफीक, सुदर्शन रुमणे, बाबाराव सरोदे, रघुनाथ आप्पा जडे,शंकर गोमासे, आनंद भंडारे,अयुबखान पठाण, सखाराम दुधाटे, ज्ञानेश्वर आबादार, सुनिल मोरे, बालासाहेब पांडे, संदीप कदम, राहुल माटे, बालाजी मॅड यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
