
नांदेड| पिण्याचे पाणी, सिंचन, शासकीय गायरान जमीन, जंगल जमीन, देवस्थान जमीन, ओबीसी आणि मराठा आरक्षण आदी प्रश्न घेऊन आज १४ रोजी भव्य इशारा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.


श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश्वर पालमकर व शिवाभाऊ नरंगले यांच्या नेत्तत्वात शहरातील महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार असल्याची माहिती भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.


दुपारी एक वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून प्रमुख मार्गदर्शक गायरान जमिन अतिक्रमण आंदोलन समितीचे समन्वयक अशोकभाऊ सोनोने, गायरान कृती समितीच्या सदस्या शमिभा पाटील, वंचितचे राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, मराठवाडा निरिक्षक अमित भुईगळ, नागोराव पांचाळ, सुरेश शेळके, गोविंद दळवी, फारुख अहमद, अक्षय बनसोडे यांच्यासह जिल्हा तथा तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

