Saturday, June 3, 2023
Home आरोग्य गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी व उपचारासाठी थर्मोग्लाइड लाँच -NNL

गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी व उपचारासाठी थर्मोग्लाइड लाँच -NNL

थर्मोग्‍लाइड हे वजनाने हलके, पोर्टेबल, एफडीए-मान्‍यताकृत डिवाईस आहे, जे वेदनादायी व लांबलचक प्रक्रिया असलेल्‍या उपचाराला आरामदायी करू शकते 

by nandednewslive
0 comment

एफडीए-मान्यताकृत उत्पादन मोबाइल ओडीटीने जेनवर्क्साच्या सहयोगाने लाँच केले

मुंबई| मोबाइलओडीटी या एआय-समर्थित सर्विकल स्क्रिनिंगवर लक्ष केंद्रित करणाऱ्या इस्रायली फेमटेक स्‍टार्टअपने भारतातील अग्रगण्‍य डिजिटल मेडिकल व हेल्‍थकेअर सोल्‍यूशन प्रदाता जेनवर्क्‍ससोबत सहयोगाने त्‍यांचे नवीन डिवाईस थर्मोग्‍लाइड लाँच केले आहे. हे वजनाने हलके, पोर्टेबल, एफडीए-मान्‍यताकृत डिवाईस आहे, जे एकाच वेळी गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा कर्करोग असलेल्‍या महिलांची तपासणी व उपचार करते. 

महिलांमध्‍ये, विशेषत: मूल होण्‍याच्‍या वयात गर्भाशयाला संसर्ग होणे सामान्‍य आहे. पण काहीच महिला पुढाकार घेऊन स्‍वत:ची तपासणी करतात. खरेतर, वैद्यकीय संशोधनांमधून निदर्शनास आले आहे की अनेक महिलांना समकालीन उपचार प्रक्रिया वेदनादायी, लांबलचक व कंटाळवाणी वाटते. उदाहरणार्थ, सर्व्हायकल एक्टोपियन हा एक सामान्य आजार आहे. यामुळे भरपूर स्त्राव होऊ शकतो आणि परिणामी, बऱ्याच महिलांना चिंता आणि त्रास होऊ शकतो. बीएमसी मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासासह अनेक अभ्यास हे सिद्ध करतात. 

आययूसीडी (इंट्रायूटरिन कॉन्‍ट्रासेप्टिव्‍ह डिवाईस), गर्भाशयाच्या ग्रीवेचा दाह आणि एक्टोपियनचा वापर यांच्यातील दुवा देखील एका वेगळ्या अभ्यासात प्रदर्शित केला आहे. आणखी एका अभ्‍यासामधून निदर्शनास आले आहे की, गर्भाशयाच्या ग्रीवेच्या एक्टोपियनवर उपचार केल्याने गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते. भारतात स्तनाच्या कर्करोगानंतर महिलांमध्ये आढळणारा हा कर्करोगाचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे.

बॅटरीवर चालणारा डिवाईस थर्मोग्लाइड थर्मो-कॉग्युलेशन तंत्र वापरते, जे उष्णतेचा वापर करून उती नष्ट करते. हे क्रायोथेरपीपेक्षा वेगळे आहे. क्रायोथेरपी आणखी एक लोकप्रिय दृष्टीकोन आहे, ज्‍यामध्‍ये उती काढून टाकण्यासाठी थंड तापमानाचा वापर करतात. जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अॅण्‍ड ग्‍यानॅकॉलॉजी रिसर्चच्या मते, थर्मो-कॉग्युलेशन क्रायोथेरपीइतकेच प्रभावी व सुरक्षित आहे आणि उच्च-दर्जाच्या ग्रीवाच्या जखमांवर उपचार करण्यासाठी सहजपणे वापरता येऊ शकते. 

साईनिवास हेल्‍थ केअरच्‍या मेडिकल डायरेक्‍टर आणि जेनवर्क्‍सच्‍या विमेन्‍स हेल्‍थच्‍या क्लिनिकल अॅडवायजर डॉ. प्रिया गणेश कुमार म्‍हणाल्‍या, ‘‘एक्टोपियनच्या बाबतीत थर्मोग्लाइडचे चांगले परिणाम लोकांना मिळत आहेत. क्रायोथेरपीनंतर रुग्णांना कमीत-कमी तीन आठवडे पाण्यासारखा स्त्रावचा त्रास होतो आणि त्यांना ते नकोसे वाटते. मोठ्या जखमांमध्ये क्रायोथेरपी वापरणे देखील आव्हानात्मक आहे, कारण या तंत्रामध्‍ये मर्यादा आहेत. पण थर्मोग्लाइड एक प्रभावी साधन ठरू शकते.’’ 

डॉ. प्रिया गणेश पुढे म्‍हणाल्‍या, ‘‘मोबाइलओडीटीच्‍या मते, हा डिवाईस जलदपणे, जवळपास आठ सेकंदामध्‍ये हिटिंग करत प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी करू शकतो आणि १०० अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवू शकतो, ज्‍यामुळे गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा त्‍वरित उपचार होऊ शकतो. थर्मोग्‍लाइडसह मी अनेक ठिकाणी हिटेड प्रोब वापरू शकते आणि ते देखील कमी वेळेत.’’ 

मोबाइलओडीटीचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी लिओन बोस्‍टन म्‍हणाले, ‘‘थर्मोग्‍लाइड हे वैविध्‍यता, व्‍यावहारिकता व सुलभ वापरामुळे प्रत्‍येक स्‍त्रीरोगतज्ञासाठी आवश्‍यक साधन आहे. हा डिवाईस सोप्‍या, वेदनाविरहित, जलद प्रक्रियेसह कर्करोगपूर्व जखमा व गर्भाशयाच्‍या ग्रीवेचा उपचार करू शकतो. आम्‍हाला आमचे सहयोगी जेनवर्क्‍स यांच्‍या सहयोगाने भारतात थर्मोग्‍लाइड लाँच करण्‍याचा अभिमान वाटण्‍यासोबत आनंद होत आहे. भारत आमच्‍यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.’’

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!