
उस्माननगर, माणिक भिसे। श्रीकृष्ण गोशाळा पोखरभोसी ता. लोहा येथे दि.१४ जानेवारी रोज शनिवारी मकरसंक्रांती दिनाचे औचित्य साधून आरोग्य देवता श्री ध्नवंतरी मुर्ती स्थापना सोहळ्याचे आयोजन केले आहे.


यावेळी सकाळी ठीक १०ते१२ या वेळात नांदेड भुषण ह.भ.प.डॉक्टर बाबासाहेब साजने महाराज नांदेड सुश्राव्य हरिकिर्तन होणार आहे. त्यानंतर स्व. श्रीनिवासजी बियाणी यांचे स्मरणार्थ बियाणी परिवार ( राज जनरल स्टोअर्स ) यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी पंचक्रोशीतील सदभक्तानी सहकुटुंब सह परिवार येवून गोदर्शन ,हरिकिर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गोभक्त, गोप्रेमी,व कृषी – गो- विज्ञान बहुउद्देशीय प्रतिष्ठान व समस्त पोखरभोसी गावकरी यांनी आव्हान केले आहे.

