
नांदेड| तालुक्यातील सोमेश्वर येथील जेष्ठ महिला सरस्वती मोहनराव बोकारे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्षे होते.


त्यांच्या पार्थिवावर 13 जानेवारी 2023 शुक्रवार दुपारी 2 वाजता सोमेश्वर येथील जुने मंदिर गोदावरी काठी समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती मोहनराव बोकारे, एक मुलगी, तीन मुले रामकिशन बोकारे, मारुती बोकारे, ज्ञानेश्वर बोकारे, सुना, नातू मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

