Monday, February 6, 2023
Home कृषी जिल्ह्यात पीक पेरा नोंदणीसाठी 14 जानेवारी रोजी प्रत्येक गावात विशेष मोहिम -NNL

जिल्ह्यात पीक पेरा नोंदणीसाठी 14 जानेवारी रोजी प्रत्येक गावात विशेष मोहिम -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| जिल्ह्यातील सर्व खातेदारांना /शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशनची माहिती व जनजागृती होण्यासाठी व त्यांच्या शेतातील पीकांची माहिती गाव नमुना नं. सातबारावर नोंदविण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही मोहिम शनिवार 14 जानेवारी रोजी मोहिम स्वरुपात प्रत्येक गावातील किमान 200 शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून आपली पीकपेरा नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

ई-पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे गाव न. नं.12 मध्ये नोंदविण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील तलाठी/कृषी सहाय्यक/पोलीस पाटील/रोजगारसेवक/रेशन दुकानदार/शेतीमित्र/कोतवाल/प्रगतीशील शेतकरी/आपले सरकार सेवा केंद्रचालक/सीएससी केंद्रचालक/संग्राम केंद्रचालक/कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी/तरुण मंडळाचे पदाधिकारी असे प्रत्येक गावासाठी किमान 20 स्वयंसेवक निश्चित केले आहेत. यांच्या सहाय्याने गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविण्याची कार्यवाही करावी असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!