
लोहा| लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार हे डॉक्टर होते इंजिनिअर होते आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी होते.शहराच्या विकासाचा पाया त्यांनी रचला त्यांच्यामुळेच या शहरात शैक्षणिक सोय झाली श्रद्धेय डॉ शंकरराव चव्हाण यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. त्यांनी साठ दशकाच्या कल त्याच्या कार्याचा वारसा या शहरातील नव्या पिढीने पुढे नेण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले


लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे धाकटे चिरंजीव प्रा डॉ डी एम पवार ,नातू सुधाकर पाटील पवार, डॉ कल्याण पाटील, यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शिवछत्रपती विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पाटील कानवटे तर व्यासपीठावर संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, आयोजक सुधाकर पवार, युवा कार्यकर्ते सचिन मुकदम, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पवार, व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण संजय चव्हाण,मुख्याध्यापक दामोधर वडजे, मुख्याध्यापक हणमंत पवार, दशरथ पवार, हरिहर धुतमल यांची उपस्थिती होती. व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण यांनी स्व.माणिकराव पाटील यांच्या कार्याचा उजाळा दिला.


ते डॉक्टर कसे होते इजिनिअर कसे होते याचे सोदाहरण दिले तर दूरदृष्टी असलेले राजकीय मोठे प्रस्थ होते अनेक प्रसंग सांगून त्यांनी माणिकराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. आयोजक सुधाकर पवार यांनी आपल्या आजोबांच्या सहवासातील अनेक प्रसंग त्यांनी सांगताना त्यांना गहिवरून आले. यावेळी संजय चव्हाण, हरिहर धुतमल यांनी पहीले नगराध्यक्ष माणिकराव पवार पाटील यांच्या कार्याची माहिती दिली प्रास्ताविक मुख्याध्यापक एच जी पवार यांनी तर आभार मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केले. संचलन आर. आर पिठ्ठलवाड यांनी केले. दीपक कानवटे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पॅड वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक -कर्मचारी उपस्थित होते.

