नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत परिसरातील संकुले, उपपरिसर लातूर, परभणी व हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि सर्व सलग्नित महाविद्यालयांना कुलगुरू महोदयांच्या आदेशान्वये कळविण्यात येत आहे की, शैक्षणिक वर्ष २०२२-२३मधील पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा दि. १ ते ३१ मे दरम्यान होणार आहेत.
परीक्षेचे अभ्यासक्रमनिहायसविस्तर वेळापत्रक परीक्षा विभागाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व संकुले आणि महाविद्यालयात चालणाऱ्या सर्व पदवी, पदव्युतरविषयाचे अभ्यासक्रम दि. ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करावेत. यासाठी आवश्यकता भासल्यास सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन/ऑफलाईन किंवा ब्लेडेड पद्धतीने शिकवणी वर्ग घ्यावेत.
व अभ्यासक्रम पूर्ण करावेत. जेणेकरून निर्धारित वेळेत परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे शक्य होईल. त्यामुळे पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल. असे पदवीधर विभागाचे सहा. कुलसचिव पी.ए. कुलकर्णी यांनी कळविलेले आहे.