
नांदेड। येथील नांदेड मर्चंट बँकेचे अधिकारी स. मंजीतसिंघ संधू तसेच न्यायाधीश स. तेजवंतसिंघ संधू यांच्या मातोश्री जसवंतकौर स्व. अंग्रेजसिंघ संधू यांचे शुक्रवार, दि. 13 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.30 सुमारास बडपुरा गेट नंबर 4 येथे निवासस्थानी निधन झाले.


शेवटच्या क्षणी त्यांचे वय 83 वर्षे होते. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या मागे कुटुंबात तीन मूलं, पाच मुली, सूनं, जवाई आणि नाटवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी नगीनाघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, नातेवाईक आणि नांदेड मर्चट्स बैंक अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

