हिमायतनगर। तालुक्यातील मौजे मंगरूळ येथिल अपंग नागरिकांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या उपयोगी साहित्याचे आज पंचायत समिती , समाज कल्याण विभाग हिमायतनगर यांच्या वतीने वाटप करण्यात आले.
गावातील अपंग बांधव या साहित्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो दिवस अखेर उजाडला आणि साहित्य वितरण करण्याची सूचना गटविकास अधिकारी मयूर कुमार अंदेलवाड यांनी दिली. त्यानुसार पांचाळ साहेब, समाज कल्याण विभाग, पंचायत समिती हिमायतनगर, गंगाधर गायकवाड, पत्रकार, उपसरपंच संतोष आंबेकर हे उपस्थित होते.
शासनस्तरावर सतत पाठपूरावा करणारे मंगरुळचे उपसरपंच संतोष आंबेकर यांचे अपंग गावकरी बांधवांकडून आभार व्यक्त केले जात आहेत. अपंग बांधवाच्या चेहर्यावरील आनंद पाहुन संपुर्ण गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.