
उस्माननगर, माणिक भिसे| हिंदवी स्वराज्याच्या जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन ठिक ठिकाणी अभिवादन करण्यात आले.


उस्माननगर येथील झेंडा चौकात राष्ट्रमाता,राजमाता,माँसाहेब जिजाऊ यांची ४२५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गुरूवर्य अवधूतबन महाराज व ग्रामपंचायत सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्याहस्ते माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, ग्रामपंचायत सदस्य सौ.लताबाई घोरबांड, सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे,सदस्य रूद्रेश्वर उर्फ संजय वारकड, पुरभाजी घोरबांड, बालाजी पाटील घोरबांड, राजू सोनटक्के,नारायण पांचाळ,राजू घोरबांड, हानंमत घोरबांड, बाळू घोरबांड, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.मारोती घोरबांड यांनी जिजाऊ वंदना गीत गायले.व जिजाऊ याच्या जिवनावर मनोगत व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले.


उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाकडून पत्रकार सभागृहात माॅ जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे सचिव प्रदीप देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी दै.विष्णुपूरी एक्स्प्रेस या पेपरच्या २०२३ या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे,उपाध्यक्ष माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे,अमजद पठाण, पत्रकार तथा शिक्षक दौलत पांडागळे, सुनील भूरे आदि उपस्थित होते.


ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर येथे राजमाता जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती साजरी केली यावेळी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड व ग्रामसेवक सौ.डी.ए. शिंदे यांच्या हस्ते माॅ जिजाऊ व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपसरपंच सदर बाशिद भाई, पोलीस पाटील विश्वंभर मोरे काँग्रेस कार्यकर्ते अमिनशहा फकीर ,अशोक काळम ग्रामपंचायत सदस्य संगीता भिसे, कमलाकर शिंदे ,संजय वारकड, शिवशंकर काळे ,सभापती प्रतिनिधी दत्ता घोरबांड,सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे, मारोती घोरबांड, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भिसे, सद्दाम पिंजारी ,परमेश्वर पोटजळेआदी उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वस्तीग्रह येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली प्रथमतः माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वस्तीगृहाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे भाषणे झाली या वस्तीगृहातील इतर कर्मचारी उपस्थित होते व अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद कन्या शाळा येथे राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख जे.एस.काळे याच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माॅ जिजाऊच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यीनी कुमारी भक्ती घोरबांड ही होती. शाळेतील मुलींकडून सामुदायिक जिजाऊ वंदनाचे पठण केले.या प्रसंगी अनेक मुली जिजाऊच्या वेशभूषेत सजल्या होत्या.

यावेळी इयत्ता १ली ते ५ तील मुला – मुलींची राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर प्रकाश टाकणारी समयोचित भाषणे झाली. यावेळी शाळेतील सहशिक्षक एकनाथ केंद्रे, गौतम सोनकांबळे,सौ.देशमुख यांनी गीत सादर केले. या कार्यक्रमास उपस्थिती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या वांगे ,अनिरूद्ध सिरसाळकर, सुर्यवंशी,पांडागळे,खान सर,सौ.लोलगे,सौ.गाजूलवाड, श्रीमती पाटोदेकर, आलेवाड,अदि शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थ्यांनी कु. श्रुती कांबळे केले तर आभारप्रदर्शन सोनकांबळे शिक्षक यांनी मानले.