Tuesday, February 7, 2023
Home लाईफस्टाइल हिमायतनगर येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी मिलिंदसेठ जन्नावार यांचं दुःखद निधन -NNL

हिमायतनगर येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी मिलिंदसेठ जन्नावार यांचं दुःखद निधन -NNL

सर्वच्या सुख दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व हरपले

by nandednewslive
0 comment

हिमायतनगर। शहरातील प्रसिध्द सराफा व्यापारी मिलिंद सुदर्शन जन्नावार यांचं अल्पशा आजाराने हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झालं. मृत्यूसमयी ते 53 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर उदय दि.१५ रविवारी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मागील दोन-तीन दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना हैद्राबाद येथील आपोलो रुग्णालयात हलण्यात आलं होतं. वैद्यकिय पथकाने अथक प्रयत्न करून उपयोग झाला नाही. आज दिनांक 14 शनिवारी 4 वाजेच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात असुन, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

सराफा व्यापारी, जन्नावार ज्वेलर्सच्या नावाने त्यांची सर्वदुर ओळख होती त्यांच्या निधनानंतर शहर व तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.15 रोजी सकाळी11 वाजता शहरातील बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!