नांदेड| सत्यशोधकीय विचार परिषदेच्या विद्यमाने आयोजित पहिले विचार परिषद नांदेड येथे दिनांक १३ जानेवारी रोजी संपन्न झाली. या परिषदेचे सुत्रसंचालन आणि प्रास्तावीक समाजिक कार्यकर्ते प्रा. इरवंत सुर्यकार यांनी केले.
या परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक दत्ता तुमवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून तहेरीकचे संपादक अल्ताफ सानी आणि सामाजिक कार्यकर्ते संजय भोसले लाभले होते. या परिषदेत नांदेड मधील बुद्धीजीवी वर्गाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या परिषदेत युवा पत्रकार दानिश आणि ईशान खान यांनी मुस्लिम समाज मुळ तत्वांना विसरत आहे. तसेच मुस्लिम नेतृत्वाच्या चुका कसे प्रगतीस बाधक ठरत आहेत यावर विचार मांडले.
प्रा.डॉ प्रकाश हिवराळे यांनी सत्यशोधकीय चळवळ व आजची परिस्थिती यावर विचार मांडले तसे डी.एन मोरे यांनी मुख्य प्रवाहत येणे किती गरजेचे आहे हे सांगितलें. अल्ताफ हुसैन आणि एस. एम समीम यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि इतिहासातील व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. सानी सरांनी वख्फच्या संपत्तीचा समाजोपयोगी कामासाठी कसा उपयोग करता येईल यावर विचार मांडले. परमेश्वर बंडेवार सरांनी एकतेची अवश्यकता सांगीतली. प्रा. बालाजी पाटोळे यांनी समाजात होत असलेली कुचबांना ही रोखली पाहिजे यावर प्रकाश टाकला. महिला प्रतिनीधी करूणा शेंडेराव यांनी सत्यशोधकीय चळवळीत महिलाची उपस्थिती यावर मत मांडले.
तदनंतर प्रा.डॉ विशाल बेलुरे यांनी अर्थशास्त्री दृष्टीकोणातून समाजाच्या प्रगतीला आलेख मांडला तर भोसले सरांनी धर्म आणि प्रगतीवर प्रकाश टाकला. प्रा.डॉ बालाजी कोंम्पलवार आणि ॲड धोंडीबा पवार यांनी परिवर्तनची गती यावर मत मांडले. अध्यक्षीय समारोपात अध्यक्षांनी चिकित्सेच्या आवश्यकतेवर आपले विचार मांडले. आभार आयोजक नजीर शेख यांनी मानले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी विविध समाजिक संघटनाचे मोलाचे सहकार्य लाभले.