
नांदेड| महापुरुषांनी समाजाच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी, परिवर्तनासाठी आणि प्रबोधनासाठी अव्याहतपणे काम केले असून हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेत जिजाऊ मॉसाहेब यांचे मोठे योगदान असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना लहानपणापासूनच नैतिकतेचे आणि नीती मूल्याचे शिक्षण देऊन महाराजांना मोठी प्रेरणा दिले असून जिजाऊ मासाहेब यांचे विचार समाजासाठी आज प्रेरक असल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे व्याख्याते आणि प्रसिद्ध विचारवंत प्रा. संतोष देवराये यांनी केले.


ते महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना प्रा. संतोष देवराये म्हणाले की इथला समाज समृद्ध करण्यात महापुरुषांचे मोठे योगदान असून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंदांनी ही या कामी मोठे योगदान दिले असून त्यांचे विचार समाजासाठी निश्चितच प्रेरक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर चे मुख्याध्यापक भारत कलवले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष अमोल भाऊ केंद्रे, ज्येष्ठ शिक्षक एन.पी.केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.सुंदाळे यांनी केले.


यावेळी कु. अनुजा चौरे,कु.स्नेहा जाधव,कु.इशा ठाकूर, कु.श्रावणी रावळे या विद्यार्थिनींनी जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर विचार मांडले. अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक भारत कलवले म्हणाले की,विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार कळावेत आणि महापुरूषांचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत यासाठी येणार्या काळात अनेक विचारवंतांना शाळेत बोलावून महापुरुषांच्या विचाराची पेरणी करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एस. खवास पाटील यांनी केले तर आभार सुनंदा वडजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आशीर्वाद गाडे, एच. आर. चव्हाण, ए. व्ही. रामगिरवार, एम. एन. गुंटूरकर, एस. पी. डांगे, अरविंद केंद्रे, पी. एम. नितीन रानशेवार, चंद्रमणी सोनकांबळे, शासकीय अध्यापक विद्यालयातील प्रशिक्षणार्थी सुचिता जाधव, इरम सबा रफिक, सुजाता कांबळे, सुचिता जोगदंड, भाग्यश्री जाधव आदींनी परिश्रम घेतले.
