
सावरगांव येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध -NNL

अर्धापुर। प्रहार जनशक्ती पार्टीचे अर्धापुर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते छगण सांगोळे पाटील यांनी सावरगाव येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जयंती साजरी केली.
राजमाता जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन पाटील सांगोळे हे होते तर प्रमुख पाहुणे ओमप्रकाश पत्रे, राजकुमार मदने, सखाराम क्षीरसागर,प्रा.शरद वाघमारे, गोविंद टेकाळे, संदिप राऊत,छगन इंगळे, उध्दवराव सरोदे, विवेक चिंचडवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी समाजसेवकांचा शालहार,डायरी,पेन देऊन स्वागत करण्यात आले,गावातील जनसामान्यांचा वाढदिवसा निमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.छगन सांगोळे म्हणाले कि, प्रत्येक मातेंनी आपापल्या पाल्यांना शिवबा बनविण्यासाठी राजमाता जिजाऊंचे विचार कृतीत आणण्याची गरज असून, चांगले संस्कार मुलांना दिल्यास निश्चितच येणारी पीढी विचारवंत व क्रांतीकारी होईल असे ते म्हणाले.यावेळी आदिंनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर भाषने केली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक कांबळे व आभार राजू पाटील आबादार यांनी मानले. यावेळी गावकऱ्यांची उपस्थिती होती.