
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील उपजिल्हा रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्साह डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी दिनांक 14 शनिवार रोजी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्नालय परिसर आणि वाढीव मंजूर झालेल्या रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर तसेच आरएमओ डॉ. राजाभाऊ बुटे यांनी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी हिमायतनगर येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी केली. सदरील बांधकाम प्रगतीपथावर असून, बांधकामाच्या गुत्तेदाराला 31 मार्च 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण करून देण्याची आदेशित केले.


तसेच गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. हिमायतनगर येथे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास येथील वैद्यकीय अधिकारी, आधीपरिचारिका व इतर कर्मचारी वर्गाचे मनुष्यबळ वाढेल, आणि रुग्णांना अधिक चांगला वैद्यकीय उपचार मिळेल असे जिल्हा शल्यचिकित्सक भोसीकर यांनी सांगितले. तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय व रुग्णालयाचा परिसर पाहणी करून रुग्णालयाचे कामकाज व रुग्णालय स्वच्छता, स्त्री कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. गायकवाड यांचे विशेष अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.


यावेळी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. गायकवाड, रुग्णालयातील डॉ. शुभांगी माने, डॉ. माधव भुर्के, डॉ.मुनेश्वर, श्रीमती चिंचलवाड, श्रीमती पैठणे, श्रीमती कोंके, श्रीमती सोनाळे, श्री वाघमारे, श्री राठोड, श्री धांडे, श्री इंगोले, श्री कल्याणकर,श्री गजानन, श्री साबळे, शे रमजान तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
