
शिवणी,प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी पासून निर्मलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवणी दयाळ धानोरा गाव सीमेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एम. एच.२६.यु.६९३५ या क्रमांकाची बजाज डीसकव्हर दुचाकी चालक दत्ता भिकू राठोड वय ३२ जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.


किनवट तालुक्यातील तल्हारी तांडा येथील रहिवासी दत्ता भिकू राठोड वय ३२ हा शेतकरी तरुण अप्पारावपेठ जवळील व्यंकटापुर येथे सासारवाडी हुन घराकडे परत येत असतांना शिवणी निर्मलच्या राज्य महामार्गावर दयालधानोरा शिवणी गावच्या सीमेवर आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या किलोमीटरवर दगडावर धडकताच दत्ता भिकू राठोड या तरुणाच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली.


रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहन धारकांनी तात्काळ त्या तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आनण्यात आले. सादरील तरुणाचे सासरे मागील २० दिवसाखली निधन झाले होते. सदरील घटनेची माहिती इस्लापुर पोलिस प्रशासनास कळताच सपोनि रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि भारत सावंत पोलीस अंमलदार संदीप साळवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतले.


सदरील घटनास्थळाचा पंचनामा व पाहणी केले. सदरील मृत व्यक्ती दत्ता राठोड यांचे सासारवाडी शिवणी परिसरातील व्यंकटापुर येथील सासऱ्याचे मागील काही दिवसाखली निधन झाले होते या अनुषंगाने सासारवाडीस भेट देण्यासाठी जाऊन परत तल्हारी तांड्या कडे येताना ही दुर्दैवी घटना घडली.ही घटना पाहण्यासाठी प्रार्थमिक आरोग्य केंद्र येथे शिवणी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. या दुर्दैवी अपघातात तल्हारी तांड्याचा तरुण दगावल्याने तल्हारी तांडा व शिवणी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मागील दोन वर्षांपासून शिवणी परिसरात विविध वाहनांच्या अपघातात वाढ झाली असून अपघाताची शृंखला दिवसोंदीवस सतत होत आहेत. यात बेजबाबदार पने वाहन चालवतांना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला असून वाहन धारकांनी आपल्या वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवून वाहन चालवने अवश्यक्यतेचे असून वाहन चालवतांना आलकुल युक्त द्रव्य प्राशन करून वाहन चालवू नये व रस्ते वाहतूक कायद्याचे काटेकोरपणाने नियम पाळावा असे अवाहन इस्लापुर पोलीस ठाण्याचे सपोनि रघुनाथ शेवाळे यांनी शिवणी-इस्लापुर परिसरात दुचाकी तीनचाकी सह इतर वाहन धारकांना आवाहन केले आहे. —– सपोनि रघुनाथ शेवाळे पोलीस स्टेशन इस्लापुर