
हिमायतनगर| मजुरीचे काम करण्यासाठी शेतीकडे जाणाऱ्या तीन मजुरांपैकी मध्यभागी चालणाऱ्या एका मजुरास भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने उडविले आहे. या घटनेत सदरील मजुराच्या नाकाशी गंभीर दखपात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे ऐसी संक्रांतीच्या उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे. बाबुराव भागाजी पांढरवाड, वय ५२ वर्ष असे मयत मजुरदाराच नावं आहे.


शहरात मजुरीचे काम करून पोट भरणारे मजूरदार आज संक्रांति सणाच्या दिवशी शहराजवळील बसवण्णा नजिकच्या एका शेतात टिन शेडचे काम करण्यासाठी गेले होते. दुपारीबसवण्णा परिसरात जेवण उरकून पुन्हा कामाच्या ठिकाणी रस्त्याने तिघे मजूर रस्त्याच्या एका बाजूने गप्पा गोष्टी करत जात होते. दरम्यान याच वेळी हिमायतनगर शहरातून सिरंजनीकडे जाणाऱ्या एका भारधाव वेगातील दुचाकीने थेट मध्यभागी चालणाऱ्या बाबुराव भागाजी पांढरवाड, वय ५२ वर्ष यांना उडविले आहे.


भरधाव वेगातील दुचाकीची जबर धडक लागल्याने सदरील मजुर उडून रस्त्यावर पडला. यावेळी त्यांच्या नाकाला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी मोठा रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तात्काळ सोबत असलेल्या इतर मजुरांनी आणि रत्स्याने ये- जा करणाऱ्या नागरिकांनी बाबुराव भागाजी पांढरवाड, वय ५२ वर्ष यांना शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता अपघातात गंभूर जखमी झालेल्या मजुरदारास मृत घोषित केले.


घटनेची वार्ता शहरात पसरातच रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली, माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, जमादार अशोक सिंगणवाड यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून, दुचाकीचालक पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची प्रकारीया सुरु केली आहे. ही घटना मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे शहरातील सण उत्सवावर दुःखाचे सावट पसरले आहे.
