
मुखेड| येथील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रँच मुखेड येथील उपक्रमशील व अष्टपैलू शिक्षक श्री शिवाजी रामराव कराळे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने राज्यशास्त्र विषयात पीएचडी (डॉक्टरेट) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान केली आहे.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ : अंमलबजावणी व परिणाम कारकतेचा अभ्यास ( विशेष संदर्भ – नांदेड जिल्हा ) या विषयात त्यांनी देगलूर महाविद्यालय, देगलूर येथील प्रा.डॉ.रत्नाकर लक्षटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन कार्य पूर्ण केले आहे. नुकतीच त्यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२१-२२ या वषार्साठी दिल्या जाणाºया क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातून निवड झाली आहे. त्यांच्या दुहेरी यशाने मुखेड तालुक्यातील शिक्षक व शिक्षण क्षेत्राचा सन्मान झाला आहे.


त्यांच्या यशाबद्दल जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे, प्राचार्य मनोहरराव तोटरे, गटशिक्षणाधिकारी कैलास होनधरणे,सतीश व्यवहारे, जि.प.हा.सावरगाव येथील मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदासराव बस्वदे,संयुक्त चिटणीस दिलीपराव देवकांबळे,विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे,भागवत पाटील,केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड, श्रीपत वाडीकर,सोमनाथ कुंभार, सुभाष दिग्रसकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,लोकप्रतिनिधी,पत्रकार, शिक्षक,पालक यांनी अभिनंदन केले आहे.

