
नांदेड| वयाच्या पाचव्या वर्षापासून टेनिस स्पर्धेत तरजेब असलेल्या शिवतेजनेसानिया मिर्झा टेनिस कोर्टवर संपन्न झालेल्या सिंगल आणि डबल अशा दुहेरी स्पर्धेत टमकदार कामगिरी करत आल इंडिया नॅशनल सिरिज आपल्या नावावर करत मोठे यश संपादन केले आहे.


हैदराबाद येथील सानिया मार्झा टेनिसकोर्टवर सात ते १४ जानेवारी दरम्यान अंडर १४ वयोगटातील आल इंडिया नॅशनल सिरिचजेआयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक मोठ्या संख्येनी सहभागीझाले होते. यात नांदेडच्या शिवतेज शिरफुलेने सिंगल मध्ये दिल्लीच्या तवीश पावा या प्रतिस्पर्धकास ६ – ४ आणि ७ – ५ अशा फरकाने हरवत अंतिम फेरीत धडक घेतली. तर अंतिम सामन्यात ग्वालियर (मध्यप्रदेश) च्या रुद्रा भातम यास ६ – २ आणि ६ – १ अशा फरकाने अंतिम सामन्यावरकब्जा केला.


या सोबतच डबलमध्ये पुणे येथील शैनकसुवर्णा आणि दक्ष पाटील यांच्या जोडीस ६ – १ आणि ६ – शुन्य अशा मोठ्या फरकाने हरवतपुन्हा अंतिम फेरीत स्थान मिळवले. डबलमध्ये शिवतेजचा अंतिम सामना ग्वालियर (मध्यप्रदेश)च्या रुद्रा भातम आणि बेंगलोरच्या प्रकास सरणे या जोडीशा झाला. यात शिवतेजने ६ –३, ६ शुन्य अशा मोठ्या फरकारने सामन्यावर विजय मिळवत डबल आणि सिंगल नॅशनल सिरिजवरकब्जा मिळवला. इंडिया नॅशनल सिरिजच्या यशानंतर शिवतेज शिरफुले नांदेडला परतआल्यानंतर नांदेड क्लबच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.


यावेळी नांदेडक्लबचे हरजिंदर सिंघ चिरागिया, श्री.दाड, भाजपचे महानराध्यक्ष प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख, टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष डाँ. किशोर विडेकर, भगवानरावआलेगावकर, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, माजी महापौर अजयसिंग बिसेन, किशोर पावडे, अमिततेहरा, मधुसुदन गुप्ता, श्री डाहे, अजय बाहेती, सतीश भेंडेकर, डॉ. सुनिल देशमुख, मागील आठ वर्षांपासून प्रशिक्षण देत असलेले शरद कानडजे, लिटिल्स स्कॅलरचे प्रमुख श्री. रेड्डी, प्राचार्य हरविंदरकौर यांनी शिवतेजच्या यशाबद्दल त्यास शुभेच्छा देऊन त्याचा विशेष सत्कार केला.
