
उस्माननगर। जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड यांच्या आदेशानुसार समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर (मोठी लाठ) ता. कंधार येथील शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड व पर्यवेक्षक राजीव आंबेकर यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली वीस शिक्षकासह जवळपास 160 विद्यार्थ्यांनी मराठवाड्यातील धार्मिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन आणि प्रत्येक्ष पाहूण सहलीचा आनंद घेतला.


सविस्तर वृत्त असे की, समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड व पर्यवेक्षक राजीव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच सहलीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात.त्याचबरोबर यावर्षी विद्यार्थ्यांना इतरत्रही परिसराची माहिती संपादन करता येते, या उध्देशाने शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अचूक असे नियोजन करून मराठवाड्यातील विविध स्थळे धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे यांना भेटी देण्यासाठी चार दिवसाची सहलीचे आयोजन केले .


समता विद्यालयाची सहल ही चार महामंडळाच्या बसेस मधून चार जानेवारी रोजी रवाना झाली होती. दिनांक चार ते आठ जानेवारी २०२३ दरम्यान मराठवाडा विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विविध पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळाविषयी विद्यार्थ्यांना माहिती प्राप्त व्हावी म्हणून शाळेच्या वतीने सहलीचे आयोजन केले होते.


सहलीतून आपल्या ऐतिहासिक ,भौगोलिक, सांस्कृतिक परिसराची माहिती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. सदरील सहल मराठवाड्यातील परळी वैजनाथ, मनमत स्वामी, धबधबा , पैठण येथील नाथसागर (जायकवाडी प्रकल्प ),देवगिरी किल्ला ,वेरूळच्या लेण्या ,कैलास लेण्या, घृनेश्वर मंदिर, म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण, भद्रा मारुती ,सिद्धार्थ गार्डन, सिद्धार्थ प्राणी संग्रहालय ,बीबीका मकबरा, जिजाऊ सृष्टी, लोणार सरोवर या स्थळांना विद्यार्थ्यांनी पाहणी करून माहिती प्राप्त करून घेतली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून समता विद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम दरवर्षी राबवीत असते त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड व पर्यवेक्षक राजू आंबेकर यांच्या संकल्पनेतून सहलीचे आयोजन केले होते .महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून १६० विद्यार्थी २०शिक्षक व पाच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी शाळेचे शिक्षक व शिक्षिका श्रीमती ज्योती शिरसागर जेगजेराव वाघमारे, बळीराम वडजे, ना .ना .लोंढे ,प्रशांत पवनेकर, बाजीराव पाटील, गौतमी कुलकर्णी, सदाशिव सोनूळे,साहेब राठोड , परशुराम लामदाडे, बालाजी नवसागरे,बसवेश्वर डांगे ,माधव स्वामी ,प्रतिक देशमुख ,शिवचंद्र वारकड ,नरेंद्र वारकड व शिक्षकेतर कर्मचारी राम पवार ,कचरू मुंगल, मारुती गोरे ,सूर्यकांत सूर्यवाड यांनी सहल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .
