
लोहा| शहरातील नामांकित कै. विश्वनाथराव नळगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रमाता, राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणात प्रसिद्ध विचारवंत, व्याख्याते रमेश पवार यांच्या व्याख्यानाने साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केरबा सावकार बिडवई होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव अशोकराव चालीकवार, प्राचार्य नागेश्वर, मु अ डी एन ठाकुर, पर्यवेक्षक माळवदकर, आदींची उपस्थिती होती. व्याख्यानाची सुरूवात राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ यांचे प्रतिमा पुजन करून जिजाऊ वंदनेने झाली. प्रसिद्ध विचारवंत, लेखक तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बहीशाल शिक्षण केंद्राचे व्याख्याते प्रा.रमेश पवार यांनी त्यांच्या रसाळ वाणीने राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांचे चरित्र सांगून जिजाऊ चरित्रातून आजच्या तरूण, तरूणीने व पालकांनी काय शिकावे यावर अनेक वर्तमानातील उदाहरण, दाखले देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


तसेच राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान याचे सर्वोच्च नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असून जगातली सर्वोत्तम आई म्हणजे राष्ट्रमाता,राजमाता माॅसाहेब जिजाऊ कशाप्रकारे आहेत,सोदाहरण सांगितले. लेकरावर संस्कार कसे असावे हे जिजाऊ कडून शिकावे तसेच आजची आई व विद्यार्थी कुठे भरकटत आहेत याचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना उद्बबोदीत केले. याप्रसंगी लोहा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.


यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी जिजाऊ व शिवबा यांची वेशभूषा परिधान केली होती, लोहा शहरातून रॅलीच्या वेळी ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले, जनतेमध्ये जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने मोठा उत्साह दिसून आला. यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक, रवि पाटील चव्हाण, हनमंत जाधव, सौ.रूद्रावार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
