
हदगाव, शे.चांदपाशा| दुचाकींचा धुमाकूळ करणाऱ्या काही धनदांडग्या युवकांकडून धुमस्टाईलने वाहने चालवन्याचे प्रकार वाढत आहेत. गर्दीच्या ठिकाणी या चिडीमारावर कोणाचही नियंत्रण नसल्यामुळे ठोस अशी कारवाई होतांना दिसून येत नाही. यामुळे पालकात चिंतेच वातवरण दिसून येत आहे. टुव्हिलरवर भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे आहे. त्यामुळे चिडीमार पथक कुठं आहे असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जातो आहे.


पोलिसांच्या या दुर्लक्षित कारभाराचेमुळे अशा टारगटांचा उपद्रव वाढत आहे. चिडीमार व भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात चौदा ते वीस वयोगटातील शालेय व महाविद्यालये मुलांचा समावेश दिसून येत आहे. शहरात शाळेच्या परिसरात व सायंकाळच्या वेळी जेथे महीला – मुलींची वर्दळ असते. याच वेळी या ठिकाणी हि टवाळखोर मुले भरधाव वेगाने वाहने चालवतात. हदगांव पोलिस स्टेशनला धुमस्टाईलने बाईक चालविणाऱ्या बद्दल पत्रकारांनी सुचना केली असता हदगाव पोलिस स्टेशनला पोलिस संख्येने कमी असल्याचे कारण सागण्यात येते.


दुसरी गंभीर विशेष बाब अशी की, शाळा महाविद्यालये सुटल्यावर काही बाईकस्वार बस्थानाकातुन बस सुटल्यावर धावणा-या एस.टी बसेसला ओव्हरटेक करुन भरधाव वेगाने बाईक चालवत असतात. यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते अस काही एस टी बसेस चालकांचे म्हणने आहे. या बाबतीत पोलिस प्रशासनाकडुन अश्या चिडीमार. रोडरोमीयो कडे दुर्लक्ष होत असल्याने अश्या चिडीमार व भरधाव वेगाने वाहने चालविणा-या टवाळखोर्या करणाऱ्यांची सांख्य वाढू लागली आहे. यावर नियनटरं ठेवण्यासाठी पोलिसांनी भूमिगत झालेल्या दामिनी पथकाला पुन्हा कार्यान्वित करून शाल, कॉलेज, बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवावे अशी नागरिकांची व पालकांची मागणी होत आहे.


कायम लक्ष आहे…पो.नि. पवार
हदगाव पोलिस स्टेशनला मान्यपदा पेक्षा पोलिसांची संख्या कमी जरी असली तरी आम्ही बस्थानक शाळा काँलेज सुटल्या नंतर बस्थानक परिसरात दोन पोलिसाची नियुक्ती केलेली आहे. अशी माहीती हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक जगनाथ पवार यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. तरीदेखील टवाळखोर करणारे कसे डोके वर काढत आहेत असा प्रश्नही पुढे येऊ लागला आहे.