
नांदेड। जुना मोंढा भागातील संत नामदेव मंदिर परिसराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असून आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल असे आश्वासन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले आहे.


मक्रर संक्रांतीचे औचित्य साधून संत नामदेव महाराज मंदिर परिसरात शिंपी समाजाच्या वतीने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तिळगुुळ वाटपाचा कार्यक्रम १५ जानेवारी आयोजीत करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर,माणिकराव चव्हाण, सरदार दिलीपसिंघ सोडी,संत नामदेव घुमान यात्रेचे मुख्य संयोजक तथा जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, प्रल्हाद उमाटे, बाळु खोमणे, सुरेश राठोड आदींची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलतांना खा.चिखलीकर म्हणाले की, गोदावरी नदीच्या तीरावर नयनरम्य निसर्गाच्या कुशीत संत नामदेव महाराज यांचे मंदिर असून 45 वर्ष जुने मंदिर आहे,45 वर्षापासून मंदिर परिसराचा विकास झाला आहे, मंदिर परिसराचा संपूर्ण विकास झाला पाहिजे अशी आपली इच्छा आहे आणि यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. कंधार- लोहा मतदार संघात ५० वर्षात जो विकास झाला नाही तो मी करुन दाखविला असून सव्वाशे कोटीचा विकास आराखडा केंद्राकडे सादर केल्याचे सांगून आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संत नामदेव महाराज मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून घोषीत करुन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.चिखलीकर यांनी सांगितले.


यावेळी शिंपी समाज बांधवाच्या वतीन तिळगुळ वाटप करुन हळदी-कुंकूचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंपी समाजाचे अध्यक्ष शंकर सिंगेवार, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, किशोर नोमुलवार,प्रा उत्तमराव बोकारे, गजानन पोटपेलवार, अशोकराव पाटील धनेगावकर,तुकाराम कोटूरवार, धनंजय उमरीकर, डॉ गजानन देवकर, गोपाल पेंडकर, सौ ज्योती सिंगेवार, डॉ मधुकर नारलावार, सरदार धुपिया अभय भुरेवार,सुरेश दलबसवार,सतीश सिंगेवार,किशोर नोमुलवार यांच्यासह शिंपी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.गणेश नोमुलवार यांनी केले. तर प्रास्ताविक नांदेड मर्चन्ट बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मण संगेवार यांनी केले.
