
नांदेड। येथील सर्वात मोठी व अद्यावत जिम असलेल्या विवांश हेल्थ क्लबच्या छत्रपती चौक शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन विवांश हेल्थ क्लब च्या वतीने करण्यात आले होते.


मागील पंधरा दिवसापासून हेल्थ क्लबच्या मेंबर्स साठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यात क्रिकेट स्पर्धा, वेट लॉस कॉम्पिटिशन, प्लाईंग कॉम्पिटिशन तसेच स्किपिंग कॉम्पिटिशन आदी स्पर्धांचे आयोजन महीला व पुरुष अश्या दोन्ही गटासाठी करण्यात आले होते.. वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले याबरोबरच छत्रपती चौक येथिल शाखेत रक्तदान शिबिराचे व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करत वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..


विवांश हेल्थ क्लबच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत
क्रिकेट स्पर्धा- प्रथम पारितोषिक विजेते कपिल सर व टीम (पारितोषिक रक्कम रोख ११,००० व चषक)द्वितीय पारितोषिक विजेते राहुल सर व टीम (पारितोषिक रक्कम रोख ५,००० व चषक) वेट लॉस कॉम्पिटिशन- पुरुष गट प्रथम पारितोषिक रवी राऊत सर (छत्रपती चौक शाखा) व आशिष कंधारकर सर (नवीन मोंढा शाखा) व इतर विजेते स्पर्धा कपिल वाडीकर, तेजस चक्के, वीरेंद्रसिंग तबेलेवाले, अजिंक्य पोलावार, गणेश लाटकर ,पुष्पक शर्मा हे आहेत तर महिला गटात नम्रता वायवळे (छत्रपती चौक शाखा) प्रतीक्षा कुटे (नवीन मोंढा शाखा) यांच्यासोबत प्रिया कदम या विजेत्या ठरल्या आहेत.


प्लाईंग कॉम्पिटिशन चे विजेते- डॉ.अन्वेष जैन प्रथम पारितोषिक ,रितेश जगताप द्वितीय पारितोषिक (नवीन मोंढा शाखा) तर विजय पाटील प्रथम पारितोषिक (छत्रपती चौक शाखा ) द्वितीय पारितोषिक श्री केंद्रे सर (छत्रपती चौक शाखा) तृतीय पारितोषिकाचे विजेते श्री अंकुश जोगदंड (छत्रपती चौक शाखा) तर महीला गटात शालिनी लोमटे (नविन मोंढा शाखा) तसेच मयुरी श्रीरामवार, आचल कदम, शोभा अग्रवाल (छत्रपती चौक शाखा) या विजेत्या ठरल्या आहेत यासोबत स्किपींग स्पर्धेत प्रियंका जाधव या प्रथम पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या तर आजमा शेख यांनी द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.. उपरोक्त स्पर्धेतील सर्व विजेत्यांना वर्धापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विवांश हेल्थ क्लबचे संचालक श्री अनिल भालेराव पाटील यांच्या हस्ते विविध पारितोषकांचे वितरण करण्यात आले यावेळी विजेत्या स्पर्धकांसह विवंश हेल्थ क्लबचे सर्व सदस्य तसेच संपूर्ण टीमची उपस्थिती होती..

युवकांमध्ये व्यायामाची गोडी लागण्यासाठी चे प्रयत्न संचालक अनिल भालेराव आजच्या तरुण पिढीला व्यायामाची गोडी निर्माण होऊन त्यांना बल उपासनेची ओढ लागावी यासाठी विवांश हेल्थ क्लब च्या माध्यमातून आपण सातत्याने प्रयत्न करत असतो आणि तरुणांत निकोप स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी विविध प्रसंगांचे औचित्य साधत अनेक स्पर्धांचे आयोजन वर्षभर करतो यातून युवकांमध्ये तणावमुक्त आयुष्य जगण्याची कला प्राप्त होते असे मत संचालक श्री अनिल भालेराव यांनी यावेळी व्यक्त केले.