
नांदेड| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरला तालुका लोहा येथील इ.१ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी मकर संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ‘करी’ च्या दिवशी निसर्ग सहलीचा अनुभव घेतला.


परिसरातील निसर्गाची अनुभुती घेतली यात विविधवृक्षवेली,पशू-पक्षी, जीवजंतू, शेतातीलपीके, भाजीपाला, शेतातील चरत असलेली जनावरे, शेती -माती ,दगड -धोंडे ,आधुनिक शेती अवजारे प्रत्यक्ष पाहून जैव विविधतेची माहिती सांगण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी कविता ,गाणी,गोष्टी ,भाषणे घेण्यात आले..भुका लागल्यावर जेवण करून जाता येता विविध निसर्ग सहलीच्या घोषणा देत मुले शाळेत परतली.


यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे ,शिक्षक उत्तम क्षीरसागर, दत्तात्रय पांचाळ, सो.मनिषा पवार ,सौ.दिपाली सनपूरकर,सौ.अंजली भंडे,सौ.ज्योतीताई हंबर्डे ,स्वंयपाकी सौ. पद्मिनबाई धुमाळेसह शेतकरी गोविंदराव कदम यांचे सर्व कुटुंब मुक्त शाळेत सहभागी होते. यांच्याच मार्गदर्शनाखाली रत्नेश्वरी देवीच्या माळाच्या पायथ्याशी गावातील प्रतिष्ठित प्रगत शेतकरी दाजीबा पाटील कदम यांच्या शेतात निसर्ग शाळा संपन्न झाली.

