
मुंबई| ब्रम्हांड ऊर्जा हेल्थकेअर या कंपनीच्या वतीने ऊर्जा आयुर्वेदाचे विविध प्रकारचे एकून १७ औषधी उत्पादनाचा शुभारंभ वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मागिल दोन वर्षापासून ऊर्जा आयुर्वेदा या ब्रँडने देशभरात आपल्या उत्कृष्ट उत्पादनामुळे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.


भारतीय प्राचीन आयुर्वेदाचे महत्व जगभरातील लोकापर्यंत पोहचवण्यासाठी ऊर्जा आयुर्वेदा प्रयत्नशील असून विविध आजारांवर मात करणाऱ्या व आरोग्यवर्धक औषधांची शास्त्रशुध्द निर्मिती केली आहे. या शुभारंभ सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी डॉ. विनायक तायडे (महामहिम राज्यपाल यांचे राजवैद्य) व डॉ.वैभव देवगिरकर (वैद्यकीय संचालक हिंदुसभा हॉस्पीटल घाटकोपर) ,डॉ.अरूण दुधमल (प्राध्यापक वैद्यकीय आयुर्वेदीक महाविद्यालय सायन) डॉ.संतोष पांडे (व्यवस्थापकीय संचालक रेजूआ एनर्जी सेंटर) , मा.महापौर सौ.मीनाक्षी शिंदे ठाणे,सिद्धार्थ ओवळेकर (शिक्षण सभापती मानपाडा माजिवडा प्रभाग समिती ठाणे मनपा) डॉ.अनिल मोरे (सायन हॉस्पिटल,डॉ.मधुरा कुलकर्णी (प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ), भावेश ओझा या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे पोलिस दलाची शान व २६/११ हल्यातील कटाचा महत्वाचा तपास करणारे पोलिस निरिक्षक श्री. वैभव धुमाळ हे खास करुन शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.


या वेळी डॉ.विनायक तायडे यांनी ऊर्जा आयुर्वेदा निर्मित उत्पादना विषयी आपले मनोगत व्यक्त करताना शुभारंभ झालेल्या सर्वच उत्पादनाची निर्मिती व संशोधन हे शास्त्रशुध्द पध्दतीने करण्यात आले असून या उत्पादनांचा प्रभाव रुग्णांसाठी अतिशय लाभदायक होईल.आयुर्वेदीक औषधी उपचार हा जगातला सर्वात प्रभावी आहे व भारतीयांना हा वारसा लाभला याचा अभिमान वाटतो असे मनोगत व्यक्त करताना ऊर्जा आयुर्वेदाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ.वैभव देवगिरकर,डॉ.अरूण दुधमल,डॉ.संतोष पांडे,डॉ.मधुरा कुलकर्णी,सौ.मिनाक्षी शिंदे,सिध्दार्थ ओवळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


या कार्यक्रमासाठी ऊर्जा आयुर्वेदाचे राज्यभरातील जिल्हा वितरक,बिझनेस प्रमोटर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमावेळी ऊर्जा आयुर्वेदाचे सर्वाधिक उत्पादने विक्री करनाऱ्या वितरकांचा व प्रमोटर यांचा सत्कार करण्यात आले. ब्रम्हांड ऊर्जा हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.विजय जंगम (स्वामी), संचालक वैजनाथ स्वामी,संचालक सचिन म्हात्रे यांनी ऊर्जा आयुर्वेदा या कंपनीच्या वतीने आयुर्वेदीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करन्याचे आश्वासन दिले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
