
नांदेड| उद्योग विभाग, मैत्री विभाग व जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी उद्योग सुलभता व व्यवसाय वाढीस अनुकुल वातावरणात चालना मिळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, उद्योग भवन, सहकारी औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड येथे बुधवार 18 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वा. कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


या कार्यशाळेचा उद्देश व्यावसायिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणाविषयी आणि वापरकर्त्यांकडून अभिप्राय मागविण्यासाठी मैत्री मुंबई यांची कार्यरत सल्लागार टीम इज ऑफ डुइंग बिजनेस सुधारणेबाबत कार्यशाळेत सादरीकरण करणार आहेत. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, सनदी लेखापाल, सनदी वास्तुरचनाकार, इंजिनिअर्स तसेच उद्योजक व्यवसायाशी संबंधीत सर्व शासकीय विभागांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

