
नविन नांदेड| शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी गटतट सोडून एकत्र येऊन आगामी मनपा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्ष जो उमेदवार देईल त्यास निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उध्दव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी सिडको येथे आयोजित नांदेड दक्षिण मतदारसंघातील आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक बैठक प्रसंगी केले.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिक महत्वपूर्ण बैठक १४ जानेवारी रोजी सिडको येथील कांचनगिरे यांच्या श्री साई सर्मथ मंगल कार्यालय येथे शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख दक्षिण भुजंगराव पाटील डक, प्रकाश मारावार,दक्षिण जिल्हा प्रमुख दता पाटील कोकाटे, माधव पावडे,उपजिल्हाप्रमुख दक्षिण वयंकोबा येडे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वत्सलाताई पुयड, कामगार सेनेचे ब्रिजलाल उगवे विधानसभा प्रमुख महेश प्रकाश खेडकर,महानगर प्रमुख पपु जाधव, तालुका महिला संघटक निकीता शहापुरवाड,शहर प्रमुख नांदेड दक्षिण अरजृन ठाकूर,शहर प्रमुख जितुसिंग टाक, बंडु खेडकर,महेश खेडकर, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती नरहारी वाघ यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ऊपसिथीत मान्यवरांच्या स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजी व ढोलताशांच्या गजरात करण्यात आले यावेळी नांदेड तालुका दक्षिण विधानसभा प्रमुख अशोक मोरे ,यांनी ऊपसिथीत मान्यवरांच्ये पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी आगामी निवडणुका संदर्भात मनपा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक अनुषंगाने गट तट बाजूला ठेऊन जो उमेदवार दिला तो निवडून आणावा , कै. आमदार प्रकाश खेडकर यांच्या काळातील शिवसेनेला गतवैभव आणुन शिवसेनेचा उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा व उमेदवार निवडून आणुन भगवा फडकावा व शिवसेना सदस्य नोंदणी शहरी, ग्रामीण भागातुन जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आवाहन केले.


या बैठकीत भुजंग पाटील,प्रकाश मारावार, व्यंकोबा येडे, तालुका प्रमुख अशोक मोरे, महानगर प्रमुख पपु जाधव , यांच्यी मार्गदर्शनपर भाषणे झाली,प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश मोरे,तर सुत्रसंचलन तुकाराम पवार यांनी शहरी व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद माजी सदस्य, साहेबराव हंबर्डे, पंचायत समिती चे माजी सदस्य दाजीबा राठोड, नामदेव पुयड, नारायण देशमुख, हनमंत घोगरे, नंदु वैध, निळकंठ काळे, माजी शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड ,साहेबराव ममिलवाड, प्रमोद मैड, माजी नगरसेवक शाम जाधव, राजेंद्र कुलथै,सतिश खैरे,कृष्णा पांचाळ,दिपक देशपांडे, माया शर्मा, संतोष देशमुख कांकाडीकर, यांच्या सह शहरी व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या झालेल्या बैठकीमुळे उध्दव ठाकरे गटाच्या शहरी व ग्रामीण भागातील शिवसैनिक पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
