नविन नांदेड| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलंग्न नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी किरण देशमुख तर उपाध्यक्षपदी शाम जाधव, सचिवपदी रमेश ठाकूर यांच्यी बिनविरोध निवड करण्यात आली.
नविन नांदेड मराठी पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक मावळते अध्यक्ष तुकाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली दतकृपा मंगल कार्यालय हडको येथे १६ जानेवारी रोजी संपन्न झाली, यावेळी नवीन कार्यकारिणी निवडीसाठी प्रस्ताव आल्यानंतर सर्वांमुनते अध्यक्षपदासाठी किरण देशमुख, उपाध्यक्ष शाम जाधव, सचिव रमेश ठाकूर, कार्याध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे, कोषाध्यक्ष निळकंठ वरळे व सल्लागार म्हणून अनिल धमणे, तुकाराम सावंत यांच्यी निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष तुकाराम सावंत यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या तर नवनिर्वाचित अध्यक्ष किरण देशमुख यांनी कार्यकारिणीला विश्वासात घेऊन सामाजिक, राजकीय, शिक्षण, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे नावलौकिक करून कार्य करणार असल्याचे सांगितले. भाजयुमो शहर भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व दतकृपा मंगल कार्यालयाचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील घोगरे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीच्ये स्वागत केले, तर नांदेड शहर काँग्रेस कमिटीच्ये उपाध्यक्ष सतिश बसवदे यांनी स्वागत केले.