
नायगांव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव शहराच्या पूर्व दिशेला शेळगाव रोडवर असलेल्या पारनेरकर महाराज यांच्या श्री गणेश साईराम जीवन कला मंदिराचा वर्धापण दिन बुधवार दि.18 जानेवारी रोजी साजरा होत असुन या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समिती व पूर्णवाद परिवार नायगाव नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे.


बुधवारी सकाळी 7.30 वाजता भक्त मारोती उप्पलवार यांच्या हस्ते महाअभिषेक संपन्न होणार आहे..सकाळी 9 वाजता आरती व दुपारी 4 वाजता अंजनावती जि.बीड येथील जीवन कला भजनी मंडळाचा भजनांचा बाहारदार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. त्या नंतर 6.30 वाजता आरती व महाप्रसाद (भंडार्याचे) आयोजन करण्यात आले आहे .तरी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती पूर्णवाद परिवार नायगाव व नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

