नांदेड| प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दत्तकुंज निवास बहाद्दरपुरा येथून बहाद्दरपुरा ते माहूर शिखर दिंडी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या आशीर्वादाने ३८ वर्ष पूर्ण करणाऱ्या या दिंडीचे दि. २३ जानेवारी रोजी सोमवारी ११:५५ वाजता श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माधवराव पाटील पेठकर यांच्याहस्ते पूजा व श्रीफळ फोडून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
ही दिंडी चिखलभोसी फाटा, जानापुरी, नवीन कौठा, दाभड, पारडी, वारंगा, सिवदरा, मानवाडी, हदगाव, पैनगंगा, उमरखेड, नांदगव्हाण, मुडाना, वाघनाथ, हिवरा असा प्रवास करीत ही दिंडी दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी क्षेत्र माहूर शिखर पायरीला पोहचणार आहे. डॉ. मनीष वडजे, दामोदर पाटील घोरबांड आणि भाऊसाहेब पाटील कदम दिंडीचे सुत्रसंचलन करणार आहेत. वसंतराव धोंडगे, रामराव डांगे, शंकरराव डांगे, राजू पेटकर, संजय एमेकर, ऑड. देवानंद देशमुख, दीपक धोंडगे दिंडीचे व्यवस्थापक आहेत.
थंडीचे दिवस असल्यामुळे अंथरून, पांघरून व आपल्याला लागणारे आवश्यक ताट, वाटी सोबत आणावे. भाविकांच्या जीविताची व मौल्यवान वस्तूची हमी दिंडी व्यवस्थापकावर राहणार नाही. दिंडीत सहभाग घेणाऱ्यांनी दीपक धोंडगे, रामराव डांगे, वसंतराव धोंडगे, राजेंद्र धोंडगे यांच्याकडे नाव नोंदणी करून प्रवेश घ्यावा असे आवाहन दिंडीचे प्रमुख श्रीधर गणपतराव धोंडगे यांनी केले आहे,दिंडीत येणाऱ्या भाविकांनी तोंडाला मास्क बांधून येणे बंधनकारक राहील.सदर दिंडीत कोरोनाचे सर्व नियम पाळले जातील असे व्यवस्थापक दीपक धोंडगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.