Saturday, January 28, 2023
Home पुणे ‘नृत्यांजली ‘ संस्थेतर्फे ‘नुपूरनाद ‘ कार्यक्रमात कथक नृत्याचे शानदार सादरीकरण -NNL

‘नृत्यांजली ‘ संस्थेतर्फे ‘नुपूरनाद ‘ कार्यक्रमात कथक नृत्याचे शानदार सादरीकरण -NNL

by nandednewslive
0 comment

चिंचवड| ‘नृत्यांजली ‘ संस्थेतर्फे आयोजित ‘नुपूर नाद’ या कथक नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध नृत्य गुरु पं. नंदकिशोर कपोते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नृत्यांजली संस्थेच्या संस्थापक गीता कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्यानी बहारदार कथक नृत्यप्रकार सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर(पिंपरी) येथे करण्यात आले होते.

गीता कुलकर्णी यांनी गतभावात प्रस्तुत केलेल्या द्रौपदी वस्त्रहरण याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.नृत्य गुरु कल्याणी कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर अशी गणेश वंदना प्रस्तुत केली. नुपूर नाद या कथक सादरीकरणाचे सूत्रसंचालन गौरी मोरे यांनी केले. या कार्यक्रमात कथक मधील परंपरेनुसार ताल प्रस्तुती, गतभाव तराना, सरगम गीत, लमछड कविता असे विविध प्रकार सादर केले गेले.

गायत्री कुलकर्णी यांनी ‘काहे रोखत डगर ‘ या ठुमरीवर अतिशय सुंदर असे नृत्य प्रस्तुत केले. गीता कुलकर्णी, गायत्री कुलकर्णी यांच्याबरोबर एकूण ४० विद्यार्थिनींनी कार्यक्रमात सहभाग घेतला. आभार प्रदर्शन गीता कुलकर्णी यांनी केले. उमेश पुरोहित, प्राजक्ता ठकार, गिरीजा कुलकर्णी, अमोल राऊत, ज्ञानेश कोकाटे, मोहित पुरणकर यांनी साथसंगत केली. पूजा कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड व माय वॉव ज्वेल्स एलएलपी (वाकड) यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता.

banner

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!