Sunday, June 4, 2023
Home औरंगाबाद आयआयबी ची संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात दमदार एंट्री -NNL

आयआयबी ची संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात दमदार एंट्री -NNL

उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर माजी विद्यार्थी डीवायएसपी दिलीप टिप्परसे यांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न

by nandednewslive
0 comment

दि.२२ जानेवारी २०२३-आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन.., नीटच्या निकालात भारतात विक्रम प्रस्थापित केलेला महाराष्ट्राचा महाब्रँड

नीट २०२२ च्या निकालातून तब्बल ४१ विद्यार्थ्यांना एम्स मध्ये प्रवेश तर १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी MBBS साठी पात्र..

संभाजीनगर/औरंगाबाद। महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीने ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संभाजीनगर (औरंगाबाद) शहरात दमदार एंट्री करत विद्यार्थी आणि पालकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण केली. संपूर्ण महाराष्ट्रात नांदेड, लातूर पिंपरी चिंचवड, पुणेशहर , कोल्हापूर शाखांना मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये दमदार पाऊल टाकले आहे.

कल्पतरु बिल्डींग, स्टेशन रोड, गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेजच्या बाजुस संभाजीनगर (औरंगाबाद)शाखेचे उद्धाटन उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर व आयआयबी चे माजी विद्यार्थी डीवायएसपी दिलीप टिपरसे यांच्या हस्ते रविवार, दि.१५ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी आयआयबीचे संस्थापकीय संचालक श्री दशरथ पाटील यांच्यासह टिम आयआयबीची उपस्थिती होती..

औरंगाबाद शहर हे मराठवाड्याची’ राजधानी’ असण्या बरोबरच एक ऐतिहासिक वारसा असलेले शहर आहे. त्याच प्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे मराठवाड्यातील नीट साठी चांगल्या गुणवतेच्या क्लासेसची उणीव आता भरून निघणार असल्याच्या चर्चा या क्षेत्रातील जाणकार करत आहेत.

औंरगाबाद हे शहर उद्योग आणि व्यापार क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे अश्या विविधतेने नटलेल्या औरंगाबाद शहरात आयआयबीच्या शाखेमुळे शैक्षणिक गुणवत्तेत निश्‍चितच भर पडणार असून महाराष्ट्राचा महाब्रँड असलेल्या आयआयबीची संपूर्ण टिम विद्यार्थ्यांना इ.११ वी, १२ वी, Board, NEET च्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहे यासाठी देशातील तज्ञ प्राध्यापक व उत्कृष्ट मॅनेजमेंट टिम या ठिकाणी उपलब्ध असणार आहे अशी माहीती आयआयबी च्या वतीने देण्यात आली..

आयआयबी महाफास्ट परीक्षेचे आयोजन.. इ. १० वीतून ११ वीत जाणाऱ्या व 11 वीतून 12 वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (FREE ADMISSION CUM SCHOLARSHIP TEST) महाफास्ट परीक्षा आयआयबीच्या सर्व शाखांकरिता असेल 11 वी करीता परीक्षा दिनांक: रविवार, २२ जानेवारी २०२३, परीक्षा मोड ऑनलाईन (IIB PCB APP) परीक्षेची वेळ : SMS द्वारे कळवली जाईल. इयत्ता 12 वी करीता सुध्दा लवकरच महाफास्ट परीक्षेचे आयोजन केले जाईल असेल श्री. दशरथ पाटील यांनी माध्यमांना सांगितले. आयआयबी महाफास्ट परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी www.iibedu.com या संकेतस्थळावर भेट द्या किंवा 7304730730| 7304567567| 8055730730| 7304567567| 9604730730 या किंवा हेल्पलाईन नंबर संपर्क करण्याचे आवाहन आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!