
नांदेड| दिनांक १३ ते १६ जानेवारी २०२३ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे झालेल्या १० व्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेशातील १४०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.


महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत २५ सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक जिंकून घवघवीत यश संपादन केले. जम्मू काश्मीर संघ २९ सुवर्ण , रौप्य व कांस्य पदक जिंकून या स्पर्धेत अव्वल स्थानी राहिला तर हरियाणा संघाने.. सुवर्ण,.. रौप्य व.. कांस्य पदके जिंकून तिसरे स्थान प्राप्त केले.


या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून बाबा सुवेग सिंग जी गुरुद्वारा लंगर साहेब ( नांदेड ), इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष श्री किशोर येवले, मोहम्मद इक्बाल (कार्यकारी अधिकारी IPSF), मा. डॉ. विठ्ठल सिंह परीहार ( स्पोर्ट डायरेक्टर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ) , मुफ्ती हमीद यासीन ( महासचिव इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशन ) इरफान अजीज भुट्टा , सौ. श्रद्धा चव्हाण ( माजी नगरसेविका नांदेड ), सौ. सुरेखा येवले ( माजी अध्यक्ष MPSA ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून १) टॅंडिंग (फाईट ) २) तुंगल ( सिंगल काता ) ३) रेगु ( ट्रीपल काता ) ४) गंडा ( demo फाईट ) ,५) सोलो ( क्रिएटीव्हीटी ) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी आपल्या ५% राखीव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड व ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया ची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम ,एशियन मार्शल आर्ट गेम, एशियन युथ गेम व एशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळला जातो.

या खेळामध्ये मागील ११ वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे. या स्पर्धेचे आयोजन इंडियन पिंच्याक सिलाट फेडरेशन च्या मान्यतेने व संत बाबा बलविंदर सिंग जी गुरुद्वारा लंगर साहेब, नांदेड व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ -विष्णुपुरी, नांदेड यांच्या सहकार्याने महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
