
हिमायतनगर। शहरातील प्रसिध्द सराफा व्यापारी मिलिंद जन्नावार यांचं निधन झाल्याची माहिती मिळताच आज दिनांक 16 सोमवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जन्नावार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.


हिमायतनगर येथील प्रसिद्ध सराफा व्यापारी, मिलिंद सुदर्शन जन्नावार यांची सराफा व्यवसायामुळे सर्वदुर ओळख होती. अल्पशा आजार झाल्याने त्यांना हैदराबाद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दिनांक 14 रोजी त्यांचे सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. सर्वांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारे व्यक्तिमत्व मिलिंद जन्नावार होते. मिलिंद यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला यावर विश्वास बसला नाही. जो आवडतो सर्वांना…. तोची आवडे देवाला…. मिलिंदच्या निधनाने झालेली व्यापारी क्षेत्रातील हाणी कधीही न भरून निघणारी आहे.


जन्नावार कुटुंबीयांच्या दुःखात मी व आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे सहकारी सहभागी आहोत. कोणतीही अडचण भासल्यास मला सांगा मी आपल्या नेहमी सोबत आहे. हे दुःख पेलण्याची ताकद ईश्वर जन्नावार कुटुंबियांना देवो असे म्हणत आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जन्नावार कुटुंबातील सदस्यांना धीर दिला आणि मिलिंद जन्नावार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.राजेंद्र वानखेडे, रमेश पळशीकर, भास्कर चिंतावार, रफिक सेठ, गणेश शिंदे, गोविंद बांडेवार, आदेश श्रीश्रीमाळ, राजू पिंचा, संजय माने, अशोक अनगुलवार, बाखी सेठ, ज्ञानेश्वर शिंदे, खालिद मतीन, पंडित ढोणे, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

