
नांदेड| महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बँक, रेल्वे, एल.आय.सी. भरतीपूर्व प्रशिक्षण तसेच पोलीस –मिलीटरी भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता विद्यार्थ्यांची नोंदणी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सुरू आहे.


इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यर्थ्याकडून अर्जासोबत ओळखपत्र, जातीचा दाखला, वैध नॉनक्रिमीलेअर दाखला, 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (गुणपत्रिका), आधारकार्ड, बँक पासबूक इत्यादी कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. यासाठी 25 जानेवारी, 2023 पर्यंत अर्ज करावा, असे व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी कळविले आहे.

