
नांदेड| शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालय, हिंदी विभागाचे प्राध्यापक व हिंदी लेखक डॉ. सुनील जाधव, भाषा सहोदरी न्यास आणि मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 10 आणि 16 जानेवारी रोजी झालेल्या ९ व्या आंतरराष्ट्रीय हिंदी परिषदेत वक्ते म्हणून मनोवैज्ञानिक विश्लेषणावर आपले सविस्तर भाषण केले.


कुठल्या ही देशासाठी समाजाचे तन व मन स्वस्थ असणे गरजेचे असते. ते जर नसेल तर देशाच्या प्रगतीवर त्याचा नकारात्मक परिणाम होते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या, व्यक्ती व समाज योग्य इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. असे मत त्यानी मांडले. त्याच्या वक्तव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. सोबतच तांच्या साहित्यिक योगदानाबद्दल लोकप्रिय साहित्यिक रामदेव धुरंधर यांच्या हस्ते सहोदरी रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आत्तापर्यंत जाधवांची 18 पुस्तके वेगवेगळ्या प्रकारात प्रकाशित झाली आहेत.


या सोहळ्यात मॉरिशसचे अध्यक्ष पृथ्वीराज सिंह रुपन आणि महात्मा गांधी संस्थेचे अध्यक्ष, अधिकारी, हिंदी विभागाचे प्राध्यापक, भाषा सहोदरी न्यासचे जयकांत मिश्रा, मीना चौधरी आणि देश-विदेशातील प्राध्यापक, अभ्यासक, लेखक, पत्रकार आदी उपस्थित होते. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.गणेशचंद्र शिंदे, महाविद्यालयाचे सचिव डॉ.डी.पी.सावंत, संचालक नरेंद्र चौहान, कोषाध्यक्ष शेंदरकर व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.

