
नांदेड। नांदेड व भोकर डीव्हिजन अंतर्गत रोड साईडच्या विद्युत पोल व रोहित्र शिफ्टींग महावितरण (एम.एस इ.बी ) च्या कामात झालेल्या भ्रष्टाचारात अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारी चौकशी समितीच्या संबंधिताची विभागांतर्गत चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे या व इतर मागण्यासाठी सदरहू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव रामा मुद्देवाड हे 23जानेवारी 2023 पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.सोबतच कार्यकर्त्यांचे बोंब मारो आंदोलनही होणार आहे.


मुद्देवाड यांनी अनेक वेळा वरिष्ठांना तक्रारी केल्यानंतर 27 जुलै 2022 रोजी उच्यस्थरिय चौकशी समिती स्थापन्यात आली.यात जयंत पाटे चौकशी समिती सदस्य तथा अध्यक्ष,प्रवीण दरोली व सुंदर लटपटे यांना सदस्य करण्यात आले.या चौकशी पत्रात संबंधित तक्रारदारास विश्वासात घेऊन उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व अवहाल कार्यालयात पाठविण्यात यावा.


परंतु तक्रार कर्त्यास या समितीने विश्वासात न घेताच थातुर मातुर (मोघम)अहवाल पाठवला.मूळ तक्रार अर्जात चौकशी अधिकारी व तक्रारदार या दोघांनी जाय मोक्यावर जाऊन चौकशी करण्यात यावी ही चौकशी व्हिडिओ चित्रीकरणात करण्यात यावी जेणे करून बोगस झालेल्या कामाची सत्य परिस्थिती समोर येईल व शासनाचे झालेले नुकसान भरपाई वसूल होईल असे मुद्दाम केले नाही. कारण भ्रष्टाचारी व एजंशीचे मालक यांच्या सोबत चौकशी समितीचे तिन्ही अधिकारी यांनी अमाप पैसे (आर्थिक देवाण घेवाण करून)घेऊन हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केलेले असल्यामुळे त्यांना आपल्या स्थरावरून फेर चौकशी करण्याची मागणी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (महावितरण) वांद्रे मुंबई यांच्या कडे केली आहे.दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असेही निवेदनात तक्रार कर्त्याने म्हंटले आहे.


भोकर डिव्हिजन अंतर्गत चालू असलेले कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे व करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यास व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्या विरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणी सह विविध मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनाच्या प्रतीलीपी मा.प्रधानमंत्री, मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय मुंबई,मा.पोलिस महासंचालक, मुंबई यांच्यासह आदींना पाठविल्या आहेत.

अधीक्षक अभियंताअधीक्षक अभियंता सु.बा. जाधव यांचा भ्रष्टाचार येणार चव्हाट्यावर… सु.बा. जाधव हे ह्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे ही मुख्य मागणी असल्यामुळे सु.बा. जाधव यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येईल.