
नांदेड| कडाक्याच्या थंडीत घरात पांघरूणात गाढ झोपायचे सोडून धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर व त्यांची टीम गेल्या २७ दिवसापासून दररोज मध्यरात्री नांदेड शहरातील विविध रस्त्यावर थंडीत कुडकूडत पडलेल्यांच्या अंगावर ब्लॅंकेट टाकत आतापर्यंत या हिवाळ्यात १३५५ बेघरांच्या अंगावर ” मायेची उब ” पांघरली आहे.या वर्षीच्या संकल्प पूर्तीसाठी आणखी ६६८ ब्लॅंकेट ची आवश्यकता असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.


भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून हा उपक्रम चार वर्ष्यापासून सुरु आहे.या वर्षी ॲड.बी.एच.निरणे, चंद्रकांत केरबा गंजेवार,ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रत्येकी १०० ब्लॅंकेट दिले आहेत. डॉ.सविता व डॉ. यशवंत चव्हाण यांनी ६० तर सचिन व सुरज बंकटलाल राठी यांनी ५० ,गोविंद रामराव किन्हाळकर यांनी ३५ ब्लॅंकेट साठी सहकार्य केले आहे.प्रत्येकी २५ ब्लॅंकेट साठी योगदान देणाऱ्यामध्ये सतीश सुगनचंदजी शर्मा,सुमित्रा शंकर हेडगे,सुनंदा जाधव पांढरे,लक्ष्मीनिवासजी शामसुंदरजी झंवर देगलूर, अ.भा.क्षत्रिय महासभा प्रदेशाध्यक्षा सुषमा नरसिंग ठाकूर, सीए शैलेंद्र विजय वट्टमवार यांचा समावेश आहे.३८जणांनी प्रत्येकी २० ब्लॅंकेट दिले आहेत.


त्यामध्ये स्नेहलता जायस्वाल हैदराबाद,रेणुका व मोहित जयप्रकाश सोनी, संजय सितारामजी जाजू, वसंत अहिरे, कु.अरुनिता आकाश झंवर,लिलादेवी सितारामजी जाजू, अभिलाषा सुमीतजी मालपाणी, सुवर्णा जहागीरदार,शिवराज विंचुरकर,नरेश सुनिल काटकर,शंकर कोंडीबा कस्तुरे,विश्वजीत मारोती कदम धानोरा, कंचनसिंह परमार, विशाल शरद वडजकर,विक्रम टर्के पाटील, शिवकांत शिंदे,प्रतीक सुधाकर पतंगे, लायन्स रिजन चेअर पर्सन योगेश जैस्वाल,अजय विश्वनाथ माळवे, उमाकांत वाकरडकर, निखिल लातूरकर,चैताली चौधरी,चंपालाल कोठारी,विजय पवार, सतीश मांडवकर कळंब, दीपक रोडा,सुशांत दिनेश चवरे,आयुष संदीप कच्छवे,डाॅ.चैताली शुबेंदू देशमुख, सविता व अरुणकुमार काबरा,सुरेश लोट,प्रशांत पळसकर, संतोष भारती, सुरेश शर्मा, गणेश व सोमेश उंद्रे, राजाभाऊ पांचाळ परभणी यांचे योगदान आहे.गत चार वर्षापासून जे वर्ष असेल तितक्या संख्येचे ब्लॅंकेट वाटप करण्यात येते.


देणगी देणाऱ्या दात्यांचे रबरप्रिंटद्वारे ब्लॅंकेटवर नाव टाकून देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येते.समाज माध्यमाद्वारे ब्लॅंकेट देणाऱ्यांची यादी उपक्रम संपेपर्यंत दररोज प्रसिद्ध करून चाळीस हजार नागरिकापर्यंत पोंहचविण्यात येते. यावर्षीच्या .संकल्प पूर्तीसाठी आणखी ६६८ ब्लॅंकेटची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांनी किमान वीस ब्लॅंकेट साठी चार हजार रुपयाची देणगी रक्कम ९४२१८३९३३३ या फोनवर गुगल पे अथवा फोन पे करून पाठवावी असे आवाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष, प्रवीण साले,भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा यांनी केले आहे.
