
अर्धापूर| नांदेड प्रगती महिला मंडळ येथील झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये कामठा बु येथील रहिवासी असलेल्या मेघाताई गजानन स्वामी यांची अर्धापूर काँग्रेस महिला तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले.

मेघाताई स्वामी या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांचे काँग्रेस पक्षातील कार्य एकनिष्ठ आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. भविष्यात महिला संघटित करण्यासाठी त्यांची ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सरपंच दुर्गा विश्वनाथ दासे, उपसरपंच रणजीतसिंघ कामठेकर,शंकर कंगारे, ॲड. सुभाष कल्याणकर , उमाजी भद्रे, विश्वनाथ पाटील कल्याणकर, मोतीराम पाटील गणपुरकर, चंद्रबशी दासे आदींनी अभिनंदन केले .

