
नायगांव। ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असणारे संगणक परिचालक हे ग्रामपंचायतचा कणा आहे. ग्रामपंचायत विभागाचे ऑनलाईन कार्य करणाऱ्या, ग्रामीण स्तरावर सेवा सुविधा देणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेची बैठक 17 जानेवारी रोजी दुपारी बळवंतराव चव्हाण सभागृह पंचायत समिती नायगाव येथे पार पडली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गर्जे, जिल्हा सचिव अंकुश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.


महाराष्ट्रराज्य संगणक परिचालक संघटनेच्या नायगांव तालुका अध्यक्षपदी रामकृष्ण मोरे तर उपाध्यक्षपदी गजानन हेंडगे, सचिव पदी हणमंत कोकुर्ले, सहसचिव बापूराव शिंदे, कोषाध्यक्ष साहेबराव ढगे, संपर्कप्रमुख किरण शिंदे, मालिकार्जून कुंभार, प्रसिद्धी प्रमुख मालू कांबळे, सर्कल प्रमुख नागेश जाधव, विश्वाबर शिंदे, संदीप गुंठे, मारोती कदम, सदस्यपदी प्रल्हाद आडकीने, सविता मोरे, संगीता रहाटे, गंगाराम पांचाळ, संभाजी उपासे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली आहे.


जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांनी सांगितले की संगणक परिचालकाच्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. संगणक परिचालकाला येणाऱ्या अडचणी, शासन स्तरावर करण्यात येणाऱ्या मागण्या, तांत्रिक अडचणी सोडणव्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यअध्यक्ष गुणवंत राठोड यांच्या नेत्रत्वाखाली संघटनेचा लढा सरकारसोबत सुरू असून आगामी काही दिवसात आपणास नक्कीच अच्छे दिन येतील असा विश्वास व्यक्त केला. पुढील बैठकीमध्ये कार्यकारणीचा विस्तार होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष शेषेराव बेलकर यांनी जाहीर केले आहे.


बळवंतराव चव्हाण सभागृहात निवड जाहीर झाल्या नंतर ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी. जी. पाटील रातोळीकर साहेब सचिव सूर्यकांत बोंडले साहेब , तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देऊन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यापुढे ग्रामसेवक संघटना तुमच्या सोबत खंबीर पणे असल्याचे टी.जी.पाटील रातोळीकर साहेब यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संचलन गजानन हेंडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्ण मोरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे आभार मालू कांबळे यांनी मांडले नंतर कार्यक्रमांची सांगता झाली. यावेळी तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
