Saturday, January 28, 2023
Home औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून जी-20 पूर्वतयारी बाबतचा आढावा -NNL

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडून जी-20 पूर्वतयारी बाबतचा आढावा -NNL

by nandednewslive
0 comment

औरंगाबाद| औरंगाबाद शहरात पुढील महिन्यात होणाऱ्या जी-20 परिषदेच्या बैठका व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज आढावा घेतला. जी-20 बैठकांच्या निमित्ताने सुरू असलेली कामे तीन आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 परिषदेच्या पूर्वतयारीबाबत आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया आदी उपस्थित होते.

जी-20 राष्ट्रसमुहाच्या परिषदेचे आयोजनाने औरंगाबादकरांना एक संधी मिळाली आहे. त्यासाठी सुक्ष्म नियोजन महत्वाचे आहे. जी-20 बैठकांमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या प्रवासाच्या मार्गावरील तसेच शहरातील संपूर्ण रस्ते, रस्त्यांची स्वच्छता, रस्ता दुरूस्ती, रस्ता दुभाजकांची कामे, उड्डाणपुलांवरील रस्ता दुभाजक, झाडांची निगा तसेच परिषदेच्या निमित्ताने आवश्यक ती सर्व कामे तीन आठवड्याच्या आत पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. कामाबाबत कोणत्याही प्रकारे हयगय सहन केली जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात या परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या अतिथींचे स्वागत, बैठकांच्या वेळी वाहतूक व्यवस्था, आपले शहर स्वच्छ व सुंदर राखून जगातील प्रमुख देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे. आपण सर्व मिळून या परिषदेच्या आयोजनात सहभागी होऊया, असे आवाहनही त्यांनी केले.

banner

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी औरंगाबाद येथे होणाऱ्या जी-20 परिषदेच्या नियोजना विषयी तसेच सुरू असलेल्या कामकाजाविषयी माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्री.चौधरी यांनीही जी-20 संदर्भात सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली. बैठकीस महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका प्रशासन, परिवहन विभाग, ऊर्जा विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!